येस न्युज मराठी नेटवर्क : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत भाजप नेते कल्याणराव काळे यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. अवघ्या दोन वर्षांतच काळेंनी भाजपला रामराम ठोकला. त्यावरुन “मधल्या काळात आपला ट्रॅक चुकला होता” अशी टोलेबाजीही कल्याणरावांनी केली. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या तोंडावर भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. सहकार शिरोमणी वसंतराव कारखान्याचे अध्यक्ष असलेले कल्याणराव काळे यांचा पूर्ण गट राष्ट्रवादीच्या भगीरथ भालकेंचा प्रचार करणार आहे
विठ्ठल परिवार एकत्र असला पाहिजे. भविष्यात परिवाराची ताकद विरोधकांना दाखवली पाहिजे. परिवार एकत्र आला पाहिजे अशी कार्यकर्त्यांची भूमिका होती. मधल्या काळात माझा ट्रॅक चुकला होता. आता जिल्हा सगळा राष्ट्रवादीमय करणार. पवार साहेबांची ताकद कायम स्वरुपी आमच्या पाठीशी असते. इथून पुढच्या काळात कायम स्वरूपी राष्ट्रवादीचे काम करणार” असं कल्याणराव काळे पक्षप्रवेशानंतर म्हणाले.