येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने ४ ते ७ एप्रिल दरम्यान सोलापुरातील १९ ठिकाणी भाजी मंडईमध्ये व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. शहरातील १९ भाजी मंडईमध्ये ही मोहीम राबविण्यात आली . एकूण २०७८ भाजीविक्रेत्यांची rt-pcr चाचणी करण्यात आल्यानंतर १११ भाजीविक्रेते कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व भाजी विक्रेत्यांना कोरोनासंदर्भात जनजागृती करून उपचार घेण्यास सांगण्यात आले आहे.