येस न्युज मराठी नेटवर्क : आयशर गाडी लावण्यावरून झालेल्या वादानंतर घरासमोरील विटा फेकत जखमी केल्याची फिर्याद निराळे वस्ती येथे राहणाऱ्या शांता बजरंग ताड त्यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात केली आहे. फिर्यादी शांता ताड यांचा मुलगा जगतराव तसेच सून आणि नात विटांचा मार लागून जखमी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे चार दिवसांपूर्वी शांता ताड यांचा मोठा मुलगा तगतराव याची आयशर गाडी लावण्याच्या कारणावरून भांडण झाले होते निराळे वस्ती येथे राहणारे सागर पांडुरंग गोसावी, विशाल नेताजी साळुंखे, शुभम गायकवाड ,आकाश सुरवसे, आकाश काळे ,आकाश बाबर, प्रशांत कवडे, ज्ञानेश्वर लांडगे या सर्वांनी एकत्र येऊन ताड यांच्या घरासमोर पडलेल्या विटा हातात घेऊन हल्ला केल्याचे शांता ताड यांनी म्हटले आहे . याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे हवालदार खाजी अधिक तपास करीत आहेत.