सोलापूर : बार्शी येथील करोना सेंटरमध्ये उमेश कोंढरे या ३७ वर्षाच्या तरुणाने स्वच्छतागृहात जाऊन मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. कोंढरे यांच्या घरातील व्यक्तींनाही करोनाची बाधा झाली होती. असे सांगण्यात आले. आत्महत्येचे नेमके कारण समजले नसले तरी, कोरोना महामारी च्या संकटाला वैतागून ही आत्महत्या केली असावी असा संशय बार्शी पोलिसांनी व्यक्त केला आहे.