पंढरपूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली असून २३ मार्च रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे. ३० मार्च रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. ३१ मार्चला छाननी तर ३ एप्रिल रोजी अर्ज माघार घेण्याची मुदत असेल. १७ एप्रिल रोजी मतदान होणार असून २ मे रोजी पंढरपुरातच मतमोजणी होईल. ४ मे पर्यंत सोलापूर शहर आणि जिल्ह्यात आचारसंहिता राहणार आहे. कोरोनाच्या पार्शवभूमीवर एका मतदान केंद्रावर १४०० ऐवजी १ हजार मतदारांचेच मतदान होईल अशी व्यवस्था केली आहे . जिल्ह्धिकारी मिलिंद शंभरकर, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे , अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी गुरुवारी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीबाबत माहिती दिली.