सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात सोमवारी रात्री 12 पर्यंत आलेल्या अहवालानुसार 93 व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सोलापूर शहरात मजरेवाडी येथील महालिंगेश्वर नगरात 71 वर्षांच्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे. तर करमाळा तालुक्यातील मिरगव्हाण येथील 73 वयाच्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यामध्ये प्रलंबित अहवाल 103 आहेत तर शहरातील प्रलंबित अहवालाची संख्या तब्बल पंधराशे 24 आहे. शहरामध्ये सोमवारी रात्री बारापर्यंत एका दिवसात 27 जणांना करणाची लागण झाली. त्यामध्ये 16 पुरुष व 11 महिला आहेत. जिल्ह्यामध्ये 66 जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्यामध्ये 39 पुरुष आणि 27 महिला आहेत . जिल्ह्यामध्ये अद्याप रुग्णालयात असलेल्यांची संख्या 497 आहे.