• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरात याठिकाणी मिळणार 250 रूपयात कोरोना लस

Yes News Marathi by Yes News Marathi
March 1, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापुरात याठिकाणी मिळणार 250 रूपयात कोरोना लस
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर,दि.1: शासकीय दवाखान्यातील कोरोना लसीकरण केंद्राशिवाय आता खासगी दवाखान्यातही कोरोनाची लस केवळ 250 रूपयात मिळणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांनी दिली.

ज्यांना शासकीय लसीकरण केंद्रावर लस घेणे शक्य नाही त्यांच्यासाठी कोविन पोर्टलवर महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतील दवाखान्यांची नोंद केली जात आहे. याठिकाणी 250 रूपये भरून केवळ 45 ते 59 वयोगटातील कोमॉर्बिड रूग्ण (व्याधीग्रस्त) आणि ज्येष्ठ नागरिकांना लस घेता येईल. याठिकाणची नोंदणी थेट लसीकरणाच्या ठिकाणी किंवा एक ते दोन दिवस आधी पोर्टलवर नोंदणी करून लस घेता येईल.

जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा आरोग्य कर्मचारी-अधिकारी पहिला टप्पा, फ्रंट लाईन वर्कर दुसरा टप्पा पार पडला असून 1 मार्चपासून तिसऱ्या टप्प्यास प्रारंभ होत आहे. तिसऱ्या टप्प्यात सात लाख जणांना लस देण्यात येणार असून यामध्ये 45 ते 59 वयोगटातील कोमॉर्बिड (व्याधीग्रस्त) रूग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात येणार असल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले.

अधिक माहिती देताना लसीकरणाचे समन्वयक डॉ. अनिरूद्ध पिंपळे यांनी सांगितले की, पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात राहिलेले आरोग्य कर्मचारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, फ्रंट लाईनवर काम करणारे यांचे ‘वॉक इन व्हॅक्सिनेशन’द्वारे थेट लसीकरण करण्यात येणार आहे. त्यांची नोंदणी प्रत्यक्ष शासकीय लसीकरण केंद्रावर ओळखपत्र तपासून करण्यात येणार असून सोबत पॅनकार्ड/मतदान कार्ड/आधारकार्ड यापैकी एक सोबत असणे आवश्यक आहे.

आजपासून कोविन ॲप 2.0 वर नोंदणी करा
45 ते 59 वयोगटातील कोमॉर्बिड (व्याधीग्रस्त) आणि ज्येष्ठ नागरिकांच्या नोंदणीसाठी सोमवारपासून कोविन ॲप 2.0 या ॲपवर नोंदणी करता येईल. नोंदणी झाल्यानंतर शासकीय रूग्णालयातील लसीकरण केंद्रावर मोफत आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेशी संलग्न खासगी रूग्णालयात 250 रूपये भरून लस घेता येणार आहे.

अशी करा नोंदणी
कोविन 2.0 ॲप किंवा आरोग्य सेतू पोर्टल डाऊनलोड करून लसीकरणासाठी नोंदणी करता येणार आहे. एका मोबाईल क्रमांकावरून जास्तीत चार लाभार्थ्यांची नोंदणी करता येईल. ओटीपी व्हेरिफिकेशन झाल्यानंतर कोविन अकाऊंट येईल. त्यावर नाव, जन्म तारीख, लिंग आदी तपशील भरावा. शासकीय किंवा खासगी दवाखान्यातील लसीकरण केंद्र, तारीख आणि वेळ निवडता येणार आहे. नोंदणी केलेल्या स्लीपची प्रिंट काढता येणार असून लाभार्थ्यांच्या मोबाईलवर संदेशही प्राप्त होणार आहे. ॲपवरून नोंदणी नको असेल तर जवळच्या शासकीय किंवा खासगी लसीकरण केंद्रावर नोंदणी करता येणार आहे.

आवश्यक कागदपत्रे
नोंदणी किंवा लसीकरणासाठी आधारकार्ड किंवा मतदार ओळखपत्र, वयाचा पुरावा.
45 ते 59 वयोगटातील व्याधीग्रस्तांना नोंदणीकृत डॉक्टरांचे सर्टिफिकेट लागणार असून याचा नमुना केंद्र सरकारकडून दिला जाणार आहे.

28 दिवसांनी दुसऱ्यांदा लस
लस घेतल्यानंतर त्याच व्यक्तीला दुसऱ्यांदा 28 दिवसांनी लस देण्यात येणार असून त्यानंतरच पूर्ण लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र प्राप्त होईल.

लसीकरण झाले तरी निष्काळजीपणा नको
लस घेतल्यानंतर प्रत्येकाने काही कालावधीसाठी काळजी घेतली पाहिजे. सुरक्षित अंतर, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर या त्रिसूत्रीचा अवलंब करावा, निष्काळजीपणा करू नका.

आतापर्यंत 32 हजार जणांनी घेतली लस
जिल्ह्यात पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात 60 हजार जणांची नोंदणी झाली होती. यापैकी 32 हजार जणांनी दोन्ही लसी घेतल्याची माहिती डॉ. पिंपळे यांनी दिली.

लसीकरणानंतर त्रास झाल्यास
लसीकरणानंतर काही जणांना त्रास जाणवतो. मात्र त्रास जाणवल्यास घाबरून न जाता जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा ग्रामीण रूग्णालयाशी संपर्क करा.

संपर्कासाठी व्हॉटसॲपवर करा संपर्क
लसीकरणाबाबत काही अडचण निर्माण झाल्यास किंवा अडचण असल्यास 9850245333 या फोन नंबरवर केवळ व्हॉटसॲप संपर्क साधावा.

कोमॉर्बिड कोणाला म्हणावे
45 ते 59 वयोगटातील व्याधीग्रस्त व्यक्ती. मधूमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, किडनी विकार, कॅन्सर, मूत्रपिंड आणि फुफ्फुसाशी संबंधित आजार अशा 20 गंभीर आजाराशी संबंधित रूग्ण कोमॉर्बिड म्हणून ओळखले जातात.

पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात राहिलेल्या व्यक्तींनी त्वरित लसीकरण करून घ्यावे. तिसऱ्या टप्प्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त लसीकरणात भाग घ्यावा, असे आवाहन डॉ. जाधव यांनी केले आहे.

सिद्धेश्वर पेठ येथील यशोधरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल,अश्विनी रुग्णालय , व सोलापूर कॅन्सर सेंटर, मदर तेरेसा हॉस्पिटल, धनराज गिरजी हॉस्पिटल, चंदन निरो सायन्सेस हॉस्पिटल.. दमानी नगर, डॉक्टर रघोजी किडनी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, मोहिते नगर, होटगी रोड या खासगी रुग्णालयात कोरोना चे लसीकरण होणार आहे त्याशिवाय सिव्हींल हॉस्पिटल येथेदेखील मोफत लसीकरण करण्यात येणार असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले.

Previous Post

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आठवड्यात ११ लाख ७९ हजारांचा दंड….

Next Post

मार्च महिन्यात वारस नोंदणी करण्याचा जिल्हा तलाठी संघाचा निर्णय….

Related Posts

गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शाळांच्या भौतिक सुविधांना प्राधान्य
मुख्य बातमी

गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शाळांच्या भौतिक सुविधांना प्राधान्य

August 28, 2026
शेतातून चक्क ४० टन ऊस गेला चोरीला !
मुख्य बातमी

शेतातून चक्क ४० टन ऊस गेला चोरीला !

August 28, 2026
सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!
मुख्य बातमी

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

August 27, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

August 26, 2026
पुढाऱ्यांच्या संस्थांनी पळवला निधी,जिल्ह्यात क्रीडा कार्यालयाकडून 45 कोटींचा खर्च…!
मुख्य बातमी

पुढाऱ्यांच्या संस्थांनी पळवला निधी,जिल्ह्यात क्रीडा कार्यालयाकडून 45 कोटींचा खर्च…!

August 26, 2026
ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!
मुख्य बातमी

ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!

August 25, 2026
Next Post
मार्च महिन्यात वारस नोंदणी करण्याचा जिल्हा तलाठी संघाचा निर्णय….

मार्च महिन्यात वारस नोंदणी करण्याचा जिल्हा तलाठी संघाचा निर्णय....

ताज्या बातम्या

रथोत्सवाच्या मिरवणुकीत जपला बहीण-भावाचा स्नेह; चिमुकली सानवीने आमदार देवेंद्र कोठेंना बांधली राखी

रथोत्सवाच्या मिरवणुकीत जपला बहीण-भावाचा स्नेह; चिमुकली सानवीने आमदार देवेंद्र कोठेंना बांधली राखी

August 28, 2026
डॉल्बीचा दणदणाट, फिरत्या प्रकाशझोतात थिरकली तरुणाई!

डॉल्बीचा दणदणाट, फिरत्या प्रकाशझोतात थिरकली तरुणाई!

August 28, 2026
सर्वांना विश्वासात घेऊनच पंढरपूरचा विकास आराखडा निश्चित करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सर्वांना विश्वासात घेऊनच पंढरपूरचा विकास आराखडा निश्चित करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 28, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026