• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अनुसूचित जाती प्रवर्गाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा – प्रणिती शिंदे

Yes News Marathi by Yes News Marathi
February 26, 2021
in इतर घडामोडी
0
अनुसूचित जाती प्रवर्गाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा – प्रणिती शिंदे
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर, दि. 26 : अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता असलेल्या विविध शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा, अशा सूचना अनुसूचित जाती कल्याण समितीच्या अध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांनी आज दिल्या.

सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांच्या आढावा बैठकीत श्रीमती शिंदे बोलत होत्या. यावेळी जिल्हा जात पडताळणी समितीच्या सदस्य तथा उपायुक्त छाया गाडेकर, समाज कल्याणचे सहायक आयुक्त कैलास आढे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सहायक प्रकल्प अधिकारी यु.जे. कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी संतोष जाधव, सहायक पोलीस आयुक्त हेमंत भट, संत रोहिदास चर्मकार व चर्मोद्योग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक नागनाथ पवार, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एम.एन. कांबळे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे व्यवस्थापक एल.ए. क्षीरसागर, महापालिकेचे नगर अभियंता संदीप कारंजे, चेतन नरोटे, वैष्णवी करगुळे यांच्यासह कामगारांचे प्रतिनिधी, विविध संघटनांचे प्रमुख उपस्थित होते.

बैठकीत सामाजिक न्याय विभागाच्या घरकुल, शिक्षण, कौशल्य विकास, जात पडताळणी अशा विविध योजनांचा आढावा घेण्यात आला.

शिंदे म्हणाल्या, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहानुभूती आणि संवेदनशीलता दाखवून योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. मागासवर्गीय समाजावर अन्याय होऊ नये, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. मनपाने सफाई कामगारांसाठी वेगळी योजना राबवावी. रमाई आणि श्रमसाफल्य घरकुल योजना वेगळ्या राबवा. मात्र दोन्ही वसाहती एकाच ठिकाणी करा. प्रत्येक विभागाने अनुसूचित जाती कल्याण समितीच्या योजनांचा निधी तत्काळ खर्च करावा. सफाई कामगारांच्या मुलांना दाखले मिळण्यासाठी प्रत्येक विभागाने प्रयत्नशील रहावे, अशा सूचना केल्या.

जातीयतेच्या कारणावरून अत्याचाराला बळी पडलेल्या अनुसूचित जाती सदस्यांना त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी जातीच्या दाखल्याऐवजी शाळा सोडल्याचा दाखला घेण्याच्या सूचनाही त्यांनी केली. समाज कल्याण अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील वसतीगृहांचा वेळोवेळी आढावा घेऊन सोयी-सुविधांचा अभाव असेल तर कारवाई करावी. जातपडताळणी समितीने विद्यार्थ्यांचे दाखले त्वरित मिळण्यासाठी कार्यवाही करावी, असेही शिंदे यांनी सांगितले.

17 नंबरचा अर्ज भरून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती मिळण्यासाठी शासनदरबारी प्रस्ताव पाठवून प्रयत्न करणार असल्याचे श्रीमती शिंदे यांनी सांगितले.

यावेळी सहायक आयुक्त आढे यांनी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती सादरीकरणातून दिली.

Previous Post

हिवाळ्यात पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढतातच; पेट्रोलियम मंत्री प्रधान यांचे विधान

Next Post

५ राज्यात विधानसभेच्या ८२४ जागांवर मतदान होणार; निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

Related Posts

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द
इतर घडामोडी

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026
सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..
इतर घडामोडी

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
Next Post
५ राज्यात विधानसभेच्या ८२४ जागांवर मतदान होणार; निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

५ राज्यात विधानसभेच्या ८२४ जागांवर मतदान होणार; निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

ताज्या बातम्या

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026