गेल्या 24 तासात राज्यभरात सहा हजार 218 कोरोना चे नवे रुग्ण आढळले आहेत इतर जिल्ह्याच्या तुलनेत सोलापूर जिल्हा अजूनही सेफ झोन मध्ये आहे. असे असले तरी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत तर त्यांच्या पाठोपाठ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना देखील कोरोना ची बाधा झाली आहे त्यामुळे सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये कोरोना चा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू नये यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी दुपारी नियोजन भवनात विशेष बैठक आयोजित केली आहे या बैठकीला आमदार आणि खासदार यांना देखील निमंत्रित केले आहे त्यामुळे पालकमंत्री कोणता महत्त्वाचा निर्णय घेणार याकडे व्यापारी वर्गाचे तसेच सामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे