अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना आजपासून अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद मोटेरा स्टेडियमचं उद्घाटन करणार आहेत. तर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मोटेरा स्टेडियमवर उपस्थित राहतील. प्रेक्षकसंख्येचा विचार करता मोटेरा जगातील सर्वात मोठं ग्राऊंड ठरणार आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियातील मेलबर्नच्या मैदानाची प्रेक्षक क्षमता सर्वाधिक होती.
1 लाख 10 हजार प्रेक्षकक्षमता
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्या तिसरी कसोटी आजपासून मोटेरा ग्राऊंडवर होत आहे. त्यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद या मैदानांचं उद्घाटन करतील. अहमदाबादमधील साबरमती येथील सरदार पटेल स्टेडियम मोटेरा या नावानं ओळखलं जाते. मोटेराच्या मैदानावर 1 लाख 10 हजार प्रेक्षकांची बैठक व्यवस्था आहे. ऑस्ट्रेलियातील मेलबर्नच्या मैदानावर 90 हजार प्रेक्षक सामना पाहू शकतात.