सलग १७ वर्षे रक्तदान करून दिली जाज्वल्य देशभक्तीची प्रचिती
सैनिक स्कूल सातारा माजी विद्यार्थी संघ – सोलापूर शाखेतर्फे २६/११ च्या मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यातील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आयोजित रक्तदान शिबिरात यंदा 45 सोलापूरकरांनी रक्तदान करून आपल्या जाज्वल्य देशभक्तीची प्रचिती दिली.

रक्तदान शिबिराचे हे यंदाचे 17 वे वर्ष असून दमाणी रक्तपेढीच्या माध्यमातून हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे मागील 16 वर्षांपासून सातत्याने हे रक्तदान शिबीर आयोजित केले जात आहे.
या वर्षी ९ वे व ३८ वे एनसीसी बटालियन तसेच संगमेश्वर कॉलेजच्या एनसीसी कॅडेट्सनी विशेषतः महिला कॅडेट्सनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून शिबिराला उत्साहाची जोड दिली.
९ व्या बटालियनचे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल बाबर यांनी भेट देऊन कॅडेट्सचे कौतुक केले.
सैनिक स्कूल सातारा माजी विद्यार्थी संघ – सोलापूर शाखेचे सदस्य आपल्या कुटुंबियांसह बहुसंख्येने उपस्थित राहून या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी गंगाधर थळंगे, संजय बुरगुटे, नागेंद्र कोंडेकर, कर्नल सुमित मार्तेंडे, रवी गायकवाड, दिगंबर, पोपट शिंदे, किरण कुलकर्णी, कबाडे, अनिल सगर,राजेंद्र पंडित तसेच सोलापूर शाखेतील सर्व माजी विद्यार्थी संघ सदस्यांनी मोलाचे परिश्रम घेतले.
तसेच ९ वे व ३८ वे एनसीसी बटालियनच्या अधिकारी व कर्मचारीवर्गाचेही उल्लेखनीय सहकार्य लाभले.

