सोलापूर : महापालिकेचा सोमवार दिनांक ७ जून रोजी चा अहवाल प्राप्त झाला आहे रविवारी रात्री बारा वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासात १५ जणांना नव्याने कोरोनाची बाधा झाली आहे. या कालावधीत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ६० आहे. दिलासादायक बाब म्हणजे या कालावधीत शहरातील एकही व्यक्ती धोरणामुळे मृत्युमुखी पडलेला नाही. शहरातील २६ प्रभागांपैकी १५ प्रभागांमध्ये एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही.
मास्क न वापरणाऱ्या १०२ जणांना ५१,००० दंड…
शहरात पोलीस आयुक्तालयाने ६ जून रोजी केलेल्या कारवाईमध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या १०२ जणांना ५१,००० रुपये दंड करण्यात आला.