सोलापूर : वाडिया हॉस्पिटल समोरील भाजी मार्केटमध्ये सहा जून रोजी खरेदीसाठी गेलेल्या असताना सुनीता परब यांच्या हँगिंग पर्समधून २९,००० रुपयांचे दागिने व रोख रक्कम चोरण्यात आल्याची फिर्याद करण्यात आली आहे. रेल्वे लाईन्स येथील विजय क्लीनिक जवळ राहणाऱ्या सुनीता परब या भाजी खरेदी करत असताना अज्ञात चोरट्याने २५,००० रुपयांचे मणी-मंगळसूत्र, पायातील चांदीचे पैंजण, २,०४० रुपये रोख चोरल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक आरेनवरु तपास करीत आहेत.