• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

युवा महोत्सवातून बलशाली राष्ट्रनिर्माते घडावेत : कुलगुरू डॉ. महानवर

Yes News Marathi by Yes News Marathi
September 28, 2026
in इतर घडामोडी
0
युवा महोत्सवातून बलशाली राष्ट्रनिर्माते घडावेत : कुलगुरू डॉ. महानवर
0
SHARES
0
VIEWS

बार्शीत सोलापूर विद्यापीठाच्या २२व्या युवा महोत्सवाचा दिमाखदार प्रारंभ; ५५ महाविद्यालयांतील सुमारे १५०० विद्यार्थी सहभागी

बार्शी- विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, सर्जनशीलतेला आणि प्रतिभेला मुक्त अवकाश देणारा युवा महोत्सव हा केवळ कलाविष्काराचा उत्सव नसून, व्यक्तिमत्त्व घडविण्याची आणि भविष्याचे समर्थ नागरिक घडविण्याची एक सशक्त प्रक्रिया आहे. या महोत्सवातून उत्तम कलावंत घडण्याबरोबरच बलशाली राष्ट्रनिर्मितीसाठी सर्वगुणसंपन्न, ऊर्जावान आणि जबाबदार युवक घडावेत, अशी अपेक्षा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल डॉ. प्रकाश महानवर यांनी व्यक्त केली.

बार्शी येथील शिवाजी महाविद्यालयात सोमवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या २२ व्या युवा महोत्सवाचा उत्साहपूर्ण आणि दिमाखदार प्रारंभ झाला. या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून कुलगुरू डॉ. महानवर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विधानपरिषदेचे आमदार राजेंद्र राऊत, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे, सचिव प्रकाश पाटील, सहसचिव अरुण देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. देवानंद चिलवंत, राजाभाऊ सरवदे, पद्मजादेवी मोहिते-पाटील, प्रा. सचिन गायकवाड, डॉ. महेश खरात, महादेव कमळे, डॉ. प्रभाकर कोळेकर, डॉ. कैलास कारंडे, प्राचार्य धीरजकुमार बाड, डॉ. समाधान पवार, डॉ. शशिकांत गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी प्रास्ताविकातून युवा महोत्सवाची भूमिका आणि उद्दिष्टे स्पष्ट करीत उपस्थितांचे स्वागत केले.

कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर म्हणाले, आधुनिक तंत्रज्ञानाने जगण्याच्या प्रत्येक क्षेत्राला व्यापून टाकले आहे. अशा काळात युवकांनी तंत्रज्ञानाचा सकारात्मक आणि सर्जनशील वापर करताना आपल्या कला, कौशल्ये आणि मानवी मूल्यांचे जतन केले पाहिजे. केवळ तंत्रज्ञानाच्या आहारी न जाता स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी सजग राहणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. युवा महोत्सव अधिक व्यापक, दर्जेदार आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना अधिकाधिक संधी देणारा व्हावा, यासाठी विद्यापीठाने महोत्सवासाठीचा निधी वाढविला आहे. विद्यार्थी कलावंतांना त्यांच्या प्रतिभेला योग्य व्यासपीठ मिळावे, यासाठी विद्यापीठात स्वतंत्र ललित कला संकुलाची इमारत उभारण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. युवा महोत्सव हा विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना आकार देणारा आणि आत्मविश्वासाला बळ देणारा अनुभव असल्याचे सांगत, विद्यार्थ्यांनी या चार दिवसांच्या कलासोहळ्याचा मनमुराद आनंद घ्यावा, अशा शुभेच्छाही डॉ. महानवर यांनी दिल्या.

आमदार राजेंद्र राऊत म्हणाले की, विद्यार्थिदशेत शिक्षणासोबतच आपल्या अंगभूत कलागुणांचा शोध घेणे आणि त्यांची मनापासून जोपासना करणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील आणि जिल्ह्यातील अनेक प्रतिभावंतांना आपल्या कलेची ओळख निर्माण करून देण्याची संधी युवा महोत्सवामुळे मिळते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देत त्यांना मोठ्या व्यासपीठावर आपली प्रतिभा सादर करण्याची संधी देणारा हा महोत्सव असून, उत्तम कलावंत घडविण्याची मोठी क्षमता या युवा महोत्सवात आहे, असे प्रतिपादन आमदार राऊत यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा हा युवा महोत्सव १ ऑक्टोबर २०२६ पर्यंत रंगणार आहे. चार दिवसांच्या या कलामहोत्सवात तब्बल ३९ विविध कला प्रकारांचे सादरीकरण होणार असून, विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील ५५ महाविद्यालयांतील सुमारे १,५०० विद्यार्थी सहभागी झाले आहेत. नृत्य, संगीत, नाट्य, साहित्य आणि विविध कलाप्रकारांच्या सादरीकरणातून बार्शी शहरात पुढील चार दिवस तरुणाईच्या सर्जनशील ऊर्जेचा आणि कलाविष्काराचा उत्सव अनुभवायला मिळणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रविकांत शिंदे व प्रा. मंजुषा श्रीमंगल यांनी केले, तर प्राचार्य डॉ. अब्दुल शेख यांनी आभार मानले.

Previous Post

आयआरसीटीसीतर्फे ‘दिव्य राजस्थान, खाटू श्यामजी आणि उज्जैन यात्रा’ भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

Next Post

दुष्काळावर तात्पुरता उपाय नव्हे तर शाश्‍वत नियोजन आवश्यक – आ. सुभाष देशमुख

Related Posts

श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या प्रेसिडेंट पदी सत्यनारायण बोल्ली यांची निवड
इतर घडामोडी

श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या प्रेसिडेंट पदी सत्यनारायण बोल्ली यांची निवड

September 28, 2026
आयआरसीटीसीतर्फे ‘दिव्य राजस्थान, खाटू श्यामजी आणि उज्जैन यात्रा’ भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा
इतर घडामोडी

आयआरसीटीसीतर्फे ‘दिव्य राजस्थान, खाटू श्यामजी आणि उज्जैन यात्रा’ भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

September 28, 2026
पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांची बैठक..
इतर घडामोडी

पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांची बैठक..

September 28, 2026
सोलापूर जिल्ह्यात उत्पादित चारा जिल्ह्याबाहेर वाहतूक करण्यास बंदी
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यात उत्पादित चारा जिल्ह्याबाहेर वाहतूक करण्यास बंदी

September 28, 2026
राज्यात 2 लाख 58 हजार 261 प्राण्यांना रेबीज प्रतिबंधक लसीकरण
इतर घडामोडी

राज्यात 2 लाख 58 हजार 261 प्राण्यांना रेबीज प्रतिबंधक लसीकरण

September 28, 2026
इतर घडामोडी

सेवा संकल्प अभियानांतर्गत बार्शीत ८२ बालकांची मोफत हृदय तपासणी

September 28, 2026
Next Post
दुष्काळावर तात्पुरता उपाय नव्हे तर शाश्‍वत नियोजन आवश्यक – आ. सुभाष देशमुख

दुष्काळावर तात्पुरता उपाय नव्हे तर शाश्‍वत नियोजन आवश्यक - आ. सुभाष देशमुख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या प्रेसिडेंट पदी सत्यनारायण बोल्ली यांची निवड

श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या प्रेसिडेंट पदी सत्यनारायण बोल्ली यांची निवड

September 28, 2026
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील याचिकेवर २२ ऑक्टोबरला होणार मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासमोर सुनावणी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील याचिकेवर २२ ऑक्टोबरला होणार मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासमोर सुनावणी

September 28, 2026
दुष्काळावर तात्पुरता उपाय नव्हे तर शाश्‍वत नियोजन आवश्यक – आ. सुभाष देशमुख

दुष्काळावर तात्पुरता उपाय नव्हे तर शाश्‍वत नियोजन आवश्यक – आ. सुभाष देशमुख

September 28, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026