• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, आशा कार्यकर्तींना मिळणार १ हजार – ग्रामविकास मंत्री

Yes News Marathi by Yes News Marathi
March 31, 2020
in मुख्य बातमी
0
ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, आशा कार्यकर्तींना मिळणार १ हजार – ग्रामविकास मंत्री
0
SHARES
0
VIEWS

मुंबई, दि. ३१ : सध्या करोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतस्तरावर जोखीम पत्करून काम करणारे सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी, मिनी अंगणवाडी कार्यकर्त्या, अंगणवाडी मदतनीस, आशा कार्यकर्ती यांना मिळणाऱ्या नियमित वेतन, मानधनाव्यतिरिक्त त्यांना १ हजार रुपये इतकी प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. याशिवाय केंद्र शासनाने आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी काढलेल्या ५० लाख रुपयांच्या विम्याच्या धरतीवर या कर्मचाऱ्यांचा ९० दिवसासाठी २५ लाख रुपयांचा विमा उतरविण्यासही मान्यता देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. यासंदर्भातील परिपत्रक आज निर्गमित करण्यात आले असून सर्व जिल्हा परिषदांना कार्यवाहीसाठी सूचना देण्यात आल्या आहेत.

मंत्री मुश्रीफ म्हणाले की, ग्रामीण पातळीवर या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामविकास विभागामार्फत उपाययोजना करण्यात येत आहेत. यासंदर्भात मा. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी आवश्यक ते निर्देश दिले आहेत. त्यानुषंगाने ग्रामपंचायत स्तरावर सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्त्या, मिनी अंगणवाडी कार्यकर्त्या, अंगणवाडी मदतनीस, आशा कार्यकर्ती यांच्यामार्फत लोकांमध्ये जनजागृती, स्वच्छता मोहीम राबविणे, आरोग्याची काळजी घेणे, आवश्यकतेनुसार सर्वेक्षण करणे इत्यादी कामे अहोरात्र मेहनत घेवून जिवाची पर्वा न करता करण्यात येत आहेत. हे कर्मचारी आपल्या जिवाची जोखीम पत्करून ही कामे करीत असल्याने त्यांना मिळणाऱ्या नियमित वेतन, मानधनाव्यतिरिक्त त्यांना १ हजार रुपये इतकी प्रोत्साहनपर रक्कम अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

तसेच केंद्र शासनाने करोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३० मार्च २०२० रोजीच्या पत्रान्वये या विषाणुच्या विरोधात लढा देणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजअंतर्गत न्यू इंडिया ॲश्युअरन्स कंपनीमार्फत ९० दिवसांसाठी ५० लाख रुपयांचा विमा उतरविला आहे. त्याच धर्तीवर ग्रामपंचायतीअंतर्गत ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्त्या, मिनी अंगणवाडी कार्यकर्त्या, अंगणवाडी मदतनीस, आशा कार्यकर्ती या कर्मचाऱ्यांचा ९० दिवसासाठी २५ लाख रुपयांचा विमा उतरविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

हा खर्च १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून भागविण्याबाबत सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयातून राज्यातील ग्रामीण भागातील करोना विषाणूच्या विरोधात लढा देणाऱ्या २ लाख ७३ हजार कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम मिळणार असून या कर्मचाऱ्यांना विम्याचेही संरक्षण दिले जाणार असल्याची माहिती मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

Previous Post

सोलापूरचा पालकमंत्री बदलला | जितेंद्र आव्हाड आता सोलापूरचे नवे पालकमंत्री

Next Post

लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांचे वेतनात कपात होणार नाही – उपमुख्यमंत्री

Related Posts

TOP 25 । आचारसंहिता संपली..आता तरी महापालिका, झेडपी पदाधिकाऱ्यांनी विकास कामाकडे द्यावे लक्ष
मुख्य बातमी

TOP 25 । आचारसंहिता संपली..आता तरी महापालिका, झेडपी पदाधिकाऱ्यांनी विकास कामाकडे द्यावे लक्ष

June 23, 2026
TOP 25 । राज्यात देवाभाऊ.. जिल्ह्यात जयाभाऊ.. आता बार्शीत राजाभाऊ…!
मुख्य बातमी

TOP 25 । राज्यात देवाभाऊ.. जिल्ह्यात जयाभाऊ.. आता बार्शीत राजाभाऊ…!

June 22, 2026
पी.एस.व्ही ट्रस्ट श्राविका संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
मुख्य बातमी

पी.एस.व्ही ट्रस्ट श्राविका संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026
तणावमुक्तीसाठी योगाचा मंत्र; 200 पोलिसांचा सामूहिक योग
मुख्य बातमी

तणावमुक्तीसाठी योगाचा मंत्र; 200 पोलिसांचा सामूहिक योग

June 21, 2026
आंतरराष्ट्रीय १२ वा योग दिन उत्साहात साजरा; निरोगी वृद्धत्वासाठी योग आवश्यक
मुख्य बातमी

आंतरराष्ट्रीय १२ वा योग दिन उत्साहात साजरा; निरोगी वृद्धत्वासाठी योग आवश्यक

June 21, 2026
कुमठे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
मुख्य बातमी

कुमठे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026
Next Post
लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांचे वेतनात कपात होणार नाही – उपमुख्यमंत्री

लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांचे वेतनात कपात होणार नाही - उपमुख्यमंत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तांदुळवाडी दुर्घटना : मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाखांची आर्थिक मदत वितरित

तांदुळवाडी दुर्घटना : मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाखांची आर्थिक मदत वितरित

June 24, 2026
वडाळा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर;आमदार सुभाष देशमुख यांचा पाठपुरावा यशस्वी

वडाळा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर;आमदार सुभाष देशमुख यांचा पाठपुरावा यशस्वी

June 24, 2026
उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

June 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026