• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

गरजूंना अन्नधान्याचा पुरवठा करा – पालकमंत्री जितेंद्र आव्हाड

Yes News Marathi by Yes News Marathi
April 3, 2020
in मुख्य बातमी
0
गरजूंना अन्नधान्याचा पुरवठा करा – पालकमंत्री जितेंद्र आव्हाड
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर दि. 3 : कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी संचारबंदी करावी लागली आहे. या काळात स्थलांतरित मजूर, गरीब आणि गरजू लोकांपर्यंत अन्नधान्य पुरवठा होईल याची व्यवस्था करा, अशी सूचना पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज येथे केली.

           पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी जिल्ह्यात केलेल्या उपाययोजनांचा आढावा बैठकीत घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना   दिल्या. आमदार प्रणिती शिंदे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुध्द कांबळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त दीपक तावरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ आदी उपस्थित  होते.

 

        बैठकीच्या सुरवातीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. त्यावर पालकमंत्री आव्हाड यांनी सांगितले की, लॉकडाऊनमुळे गरीब, स्थलांतरित मजूर आणि निराधार लोकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या. अन्नधान्याचा पुरेसा साठा करुन ठेवा. कमी पडत असल्यास आणखी मागवून घ्या. यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी केशरी कार्डधारकांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून धान्य मिळत नसल्याबद्दल सांगितले. याबाबत  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि सचिव संजय खंदारे यांच्याशी चर्चा केली जाईल. धान्य मिळण्यासाठी प्रयत्न करु, असे आव्हाड यांनी सांगितले.

 

        वैद्यकीय उपाययोजनेसाठी आवश्यक असणारी व्हेंटीलेटर, साधन आणि यंत्र सामग्री तत्काळ मागवून घ्या. पीपीई किट, सॅनिटायझर, यांचा पुरेसा साठा सर्व शासकीय दवाखान्यात उपलब्ध करुन घ्या. कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे का याची चाचणी करणारी रॅपिड टेस्ट किट उपलब्ध करुन घ्यावीत, अशा सूचना  आव्हाड यांनी दिल्या.

 

        निराधार, स्थलांतरित मजुरांना कम्युनिटी किचनच्या माध्यमातून अन्न उपलब्ध करुन द्या. यासाठी स्वयंसेवी संस्था, साखर कारखाने, उद्योजक, व्यावसायिक यांच्याकडून मदत घ्या. यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र निधी उभारण्यासाठी प्रयत्न करा, असे त्यांनी सांगितले.

 

        खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी दवाखाने सुरु ठेवावेत यासाठी आवाहन करावे. जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात किमान एक कम्युनिटी क्लिनिक सुरु करा. या क्लिनिकसाठी खासगी डॉक्टरांना आवश्यक असणारी जागा, साहित्य आणि औषधे द्यावीत, असे आव्हाड यांनी सांगितले.

        यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले आदी उपस्थित होते.

 

पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिलेल्या सूचना

 

  • अन्नधान्याचा पुरवठा सुरळीत करा.
  • कम्युनिटी किचन, कम्युनिटी क्लिनिकस् सुरु करा.
  • साखर कारखानदार, उद्योजक, व्यापारी, स्वयंसेवी संस्था यांची मदत घ्या.
  • सोलापूर शहरात फवारणी करा.
  • खासगी दवाखाने सुरु ठेवण्याचे आवाहन करावा.
Previous Post

रा.स्व. संघ जनकल्याण समितीतर्फे 5 हजार कुटुंबांना 15 दिवसाचे मोफत धान्य; वाटप सुरू

Next Post

पुणे विभागात कोरोनाचे 101 रुग्ण पॉझिटीव्ह -डॉ. दीपक म्हैसेकर

Related Posts

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!
मुख्य बातमी

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!
मुख्य बातमी

कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!

August 21, 2026
Next Post
पुणे विभागात कोरोनाचे 101 रुग्ण पॉझिटीव्ह -डॉ. दीपक म्हैसेकर

पुणे विभागात कोरोनाचे 101 रुग्ण पॉझिटीव्ह -डॉ. दीपक म्हैसेकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026