नववधूचे लग्नासाठी तयार केलेल्या १६ तोळे दागिन्यांची चोरी, पोलिसांकडून २४ तासात उघड..

0
12

सोलापूर : शहरामध्ये मागील काही दिवसांमध्ये सोलापुर शहरात चोरीचे विविध पोलीस ठाणेस गुन्हे दाखल झाले आहेत. त्या अनुषंगाने मा. पोलीस आयुक्त सो, सोलापूर शहर राजेंद्र माने व पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा) बापू बांगर सो, मा. सहा पोलीस आयुक्त सो, डॉ. प्रिती टिपरे यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना सदरचे गुन्हे दाखल झाल्यास सदर ठिकाणी तात्काळ भेट देऊन, गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेश दिले होते. त्या अनुषंगाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल दोरगे सो, यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना गुन्ह्यांचा अभ्यास करून तसेच अभिलेखावरील आरोपी तपासून बातमीदारा मार्फत माहीती घेऊन गुन्हे उघडकीस आणणे बाबत वेळो वेळी मार्गदर्शन केले होते.

दिनांक १५/०६/२०२२ रोजी मुंबई येथून सायंकाळी महिला फिर्यादी या मुंबई येथून हुमनाबाद येथे जाण्यासाठी जय भवानी ट्रॅव्हल्स कंपनीच्या क्रमांक एन. एल. १ बी १२६५ या बसमध्ये बसले होते. त्यांना प्रवासा दरम्यान दि.१६/०६/२०२२ रोजी सकाळी ०६.०० वा. चे सुमारास त्यांचे बॅग मधील सोन्याचे दागिने, मोबाईल व रोख रक्कम चोरीस गेल्याचे समजले. त्यानुसार फौजदार चावडी पोलीस स्टेशन गु.र.नं. ३८५/२०२२ भाद वि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा घडल्याची माहीती मिळताच, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुनिल दोरगे यांचे सुचने प्रमाणे गुन्हे शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक संजय क्षिरसागर व त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार यांनी तपास सुरु केला. सदर गुन्हयातील फिर्यादी व त्यांचे सोबत प्रवासी बस मध्ये असलेले त्यांचे नातेवाईक यांची भेट घेऊन त्यांचेकडुन घटने बाबत माहीती घेतली. त्यानंतर तात्काळ तपास सुरु करुन, प्रथम नमुद खाजगी बस मधील सर्व प्रवासी यांची सदर बसचे मुंबई येथील बुकींग ऑफीस येथुन माहीती घेतली. तसेच बसचे चालक नामे मोहमद ईस्माल कुरेशी व कंडक्टर यांचेकडे प्राथमिक चौकशी करुन त्याप्रमाणे तपास सुरु केला. नमूद बस चालक याने माहिती दिली की, मुंबई येथून एक प्रवासी बसवकल्याण, कर्नाटक येथे जाण्यासाठी बसला होता, परंतु त्याने पोटात दुखत असल्याचे कारण सांगुन, प्रवासादरम्यान मध्येच सोलापुर येथे दिनांक १६/६/२०२२ रोजी पहाटे ०५.०० वा. चे सुमारास उतरल्याची माहीती दिली. तसेच नमूद संशयित इसमाचे वर्णन देखील बस चालकाने गुन्हे शाखेच्या पोलीसांना सांगितले.

याप्रमाणे मिळालेल्या माहितीवरून, सपोनि संजय क्षिरसागर व त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार यांनी तपास सुरु केला असता, सपोनि संजय क्षिरसागर यांचे गोपनीय बातमीदार यांनी त्यांना माहीती दिली की, बस चालकाने सांगितलेल्या वर्णनाशी मिळत्या जुळत्या वर्णनाचा एक इसम हा लिंगराज वल्याळ मैदान जवळ, सार्वजनीक रोडवर फिरत आहे. त्या प्रमाणे, सपोनि संजय क्षिरसागर व त्यांचे तपास पथकाने, सदर ठिकाणी तात्काळ जाऊन संशयित इसमास ताब्यात घेतले. चौकशीमध्ये संशयित इसमाचे नाव दिलीप ऊर्फ धनुष रामण्णा माने वय-२४ वर्ष व्यवसाय – ड्रायव्हर, रा. मंठाळ, महादेव मंदिर जवळ, ता. बसवकल्याण जि. बिदर राज्य कर्नाटक असे असल्याचे निष्पन्न झाले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याचे अंगझडतीत, फौजदार चावडी पोलीस स्टेशन गु.र.नं.३८५/२०२२ भा द वि कलम ३७९ प्रमाणे दाखल गुन्हयातील, चोरीस गेलेले सोने १६४ ग्रॅम ८४० मिली, मोबाईल व रोख रक्कम असा एकुण ६,८०,४२०/- रू किंमतीचा (१०० टक्के) मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील फिर्यादी हिचे चार दिवसांमध्ये हुमनाबाद येथे लग्नकार्य होते. सदरचे दागिने हे तिचे लग्नासाठी तयार करून घेतलेले होते.

फौजदार चावडी पोलीस स्टेशन गु.र.नं.३८५ / २०२२ मा द वि कलम ३७९ प्रमाणे दाखल गुन्हयाचा उत्कृष्टपणे व मोठया शिताफिने तपास करून २४ तासामध्ये आरोपी निष्पन्न करुन त्यास अटक करण्यात आले. आरोपीकडुन गुन्हयात गेलेला १००% मुद्देमाल हस्तगत करून सदर गुन्हा उघडकीस आणला आहे.

सदरची कामगिरी मा.पोलीस आयुक्त सोलापूर शहर श्री. राजेंद्र माने, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा) श्री.बापु बांगर, मा.सहा. पोलीस आयुक्त सो, डॉ. प्रिती टिपरे मॅडम, मा. वपोनि. (गुन्हे) श्री. सुनिल दोरगे यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक/रांजय क्षिरसागर, महेश शिंदे, राजु मुदगल, कुमार शेळके, तात्यासाहेब पाटील, कृष्णात कोळी, विद्यासागर मोहिते, वरािग शेख, प्रकाश गायकवाड, शिध्दाराम देशमुख, अजय गुंड, विजय वाळके, चालक महेंद्र ठोकळ, यांनी पार पाडली.