ट्विटरची ‘चिमणी’ बदलली, नव्या रंगात आणि नव्या लोगोसह Twitter X यूजर्सच्या भेटीला

0
37

येस न्युज नेटवर्क : इलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यापासून कंपनीत सतत काहीना काही बदल करत आहेत. आता इलॉन मस्क यांनी ट्विटरचे रंगरूप बदलले आहे. ट्विटरचा लोगो असलेली चिमणी आता बदलली असून आता इलॉन मस्क ट्विटरचा नवा लोगो X आहे.

इलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यापासून कंपनीत सतत काहीना काही बदल करत आहेत. त्यामुळे त्याचे कौतुक आणि टीकाही झाली. आता इलॉन मस्क ट्विटरची ओळख बदलली आहे.ट्विटरच्या बर्डची जागा X या लोगोने घेतली आहे. इलॉन मस्कने त्याच्या बहुतेक कंपन्यांच्या नावांमध्ये आणि लोगोमध्ये X या शब्दाचा समावेश केला आहे. त्यामुळे ट्विटरच्या नवीन लोगोवर देखील Xचे वर्चस्व आहे. अलीकडेच इलॉन मस्कने लॉन्च केलेल्या एका आर्टिफिशिअर कंपनीला xAI असे नाव देण्यात आले आहे. त्याच वेळी मस्कच्या स्पेस एक्सप्लोरेशन टेक्नॉलॉजीज कॉर्पोरेशन कंपनीचे नाव देखील स्पेसएक्स आहे. आता मस्क देखील X या शब्दाने ट्विटर बर्ड लोगो बदलला आहे.