कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! खात्यात जमा PF वर मिळणार जबरदस्त व्याज

0
34

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. ईपीएफओने PF मधील ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. EPFO च्या प्रस्ताव स्वीकारत वित्त मंत्रालयाने PF वर आर्थिक वर्ष 2023 साठी 8.15 टक्के व्याजदर मंजूर केला आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये आता पीएफ खातेदाराला 8.15 टक्के दराने व्याज मिळणार आहे. यापूर्वी मार्चमध्ये 2021-22 साठी EPF वरील व्याज 8.1% या नीचांकी पातळीवर घसरलं होतं. पीएफ खातेदाराच्या खात्यात जमा केलेली रक्कम EPFO अनेक ठिकाणी गुंतवते आणि या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या कमाईचा एक भाग खातेदारांना व्याजाच्या स्वरूपात दिला जातो.

व्याजदर वाढीच्या प्रस्तावाला सरकारची मंजुरी
मार्चच्या सुरुवातीला झालेल्या दोन दिवसीय बैठकीत EPFO ​​ने आपल्या सदस्यांसाठी 2022-23 साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) वर व्याजदर वाढवण्याची घोषणा केली होती. यानंतर, 2022-23 साठी EPF ठेवींवरील व्याजदरात वाढ करण्यासाठी तो प्रस्ताव मंजुरीसाठी वित्त मंत्रालयाकडे पाठवण्यात आला होता आणि त्याला आज मंजुरी देण्यात आली आहे. आता सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर, 2022-23 साठी EPF वरील व्याजदर EPFO ​​च्या पाच कोटींहून अधिक खातेदारांच्या खात्यात हस्तांतरित केला जाईल.