सोलापूर जिल्ह्यातील तीन व्यक्तींचे पाकिस्तान मधील दहशतवादी संघटनेची कनेक्शन असल्याचे सिद्ध झाले आहे. या तिघांनाही अटक करण्यात आली असून त्यांनी एक बोगस ॲप काढून त्या माध्यमातून सुमारे दहा कोटी रुपये ची मदत गोळा केली आहे. मुंबईच्या एटीएस पथकाने सोलापुरातील या तिघांना अटक केली आहे. विशेष म्हणजे या तिघांच्याही मोबाईल मध्ये दहशतवादी संघटनेची संबंधित असलेले चार व्हाट्सअप ग्रुप सापडले असून पन्नास पाकिस्तानी नंबर आढळले आहेत. या तीनही आरोपींवर एटीएस पथकाने गंभीर पुरावे सादर केले असून त्यांनी देशद्रोही आणि देश विघातक कृत्य करण्यासाठी लोकांचा पैसा जमा केला. त्यांचे पाकिस्तानशी कनेक्शन सिद्ध झाल्यामुळे त्यांना जामीन देऊ नये असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील एडवोकेट प्रदीप सिंह राजपूत यांनी केला. या प्रकरणामुळे सोलापूर शहर जिल्ह्यात चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे.










