काँग्रेसचे ‘हे’ दिग्गज नेते रविवारी सोलापुरात..!

0
16

कर्नाटकात काँग्रेसला निर्विवाद बहुमत मिळाल्यामुळे पक्षाला हत्तीचे बळ. त्यामुळे राज्यभर काँग्रेसचे कार्यक्रम वाढू लागले आहेत. रविवारी सोलापुरात काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे तर हुतात्मा स्मृती मंदिरात कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावा आयोजित केला आहे. काँग्रेसचे नेते सुशील कुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोकराव चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बाळासाहेब थोरात, हे दिग्गज नेते रविवारी हुतात्मा स्मृती मंदिरात जाहीर मेळाव्यासाठी येणार आहेत यूपीएससी केंद्राचे उद्घाटन, शुभराय आर्ट गॅलरी चे भूमिपूजन, अहिल्यादेवींच्या मूर्तींचे वाटप आधी विविध कार्यक्रम आयोजित केले असून याच कार्यक्रमात अनेक कार्यकर्ते काँग्रेस पक्षात प्रवेश करतील अशी माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी एस न्यूज मराठीशी बोलताना दिली.