सोलापूर: उत्तर सोलापूर मराठा समाजातील सर्व युवक, युवतींनी मराठा महामंडळातील विविध योजनांचा लाभ घ्यावेत असे आवाहन नरेंद्र पाटील यांनी केलं आहे. नरेंद्रजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा कार्यालयात बैठक संपन्न झाली. मराठा समाजातील युवक व युवतींनी आर्थिक प्रोत्साहन देण्याकरीता मार्गदर्शन, लघु उद्योग, मध्यम व मोठ्या उद्योगांक स्थापन करण्यासाठी पुढाकार घ्यावा. नोकरी च्या मागे न लागता रोजगार उपलब्ध करून द्यावा, लहान मोठा व्यवसाय चालू करावेत असे आवाहन करण्यात आले. लागणारे कागदपत्रे, बँकांची
लोन, व्याज परतावा व इतर बाबींसाठी योग्य ते मार्गदर्शनही केले जाईल, यावेळी भाजप शहराध्यक्ष विक्रम देशमुख, जिल्हा संघटक- शशिकांत चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष गणेश भोसले, माजी नगरसेवक आनंद जाधव यांच्यासह कार्यकर्त उपस्थित होते.