पर्यावरण पूरक गणेश मूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळेत शहरातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे: आयुक्त शीतल तेली-उगले यांचे आवाहन

0
33

माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याची मोफत कार्यशाळा

सोलापूर – सोलापूर महानगरपालिका व गणेशयुग, सोलापूर आयोजित पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याच्या मोफत कार्यशाळचे आयोजन दिनांक 11 सप्टेंबर 2023 सकाळी 9.00 ते 12 .00 स्थळ:- राजीव गांधी, इनडोअर स्टेडियम, अश्विनी हॉस्पिटल शेजारी, सोलापूर येथे करण्यात आलेले आहे. सोलापूर महानगरपालिका व श्री गणेशयुग सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम घेण्यात येत असून या कार्यशाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनीना श्री गणेशयुग सोलापूर चे संस्थापक श्री विकास गोसावी हे गणेशमूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण देणार आहेत. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना सर्व साहित्य सोमपाकडून मोफत दिले जाणार आहे, कार्यशाळेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांचे आवाहन…
शहरातील सर्व शाळांमधील प्रत्येकी 5वी ते 12वी ह्या वर्गातील एकूण 10 विद्यार्थी (5विद्यार्थीनी, 5विद्यार्थी व एक कला शिक्षक) ह्या इको फ्रेंडली गणेश मूर्ती कार्यशाळेसाठी सहभाग नोंदवावा तसेच या कार्यशाळेत हाताने बनवलेल्या श्री गणेशाची मूर्ती आपापल्या घरात प्रतिष्ठापना करावी असे मा आयुक्त शीतल तेली -उगले यांनी आवाहन केले आहे.

टीप:
१) ही कार्यशाळा शालेय विद्यार्थ्यांना मोफत आहे .
२) यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे.
3) कार्यशाळेसाठी लागणारे साहित्य (माती) मनपाकडून उपलब्ध करून दिली जाईल.
4) येताना सर्व विद्यार्थ्यांनी हात पुसण्यासाठी नॅपकिन, पाण्याचा मग, वॉटर बॉटल घेऊन यावे.
5) प्रत्येक शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांची यादी खाली दिलेल्या नंबर वर एक्सेल (Excel) स्वरुपात पाठवावी.
संपर्क :
श्री विकास गोसावी – 9822660121,
श्री स्वप्नील सोलनकर-
9657421081