• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

‘शासन आपल्या दारी’ राज्यस्तरीय अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते साताऱ्यात होणार शुभारंभ

Yes News Marathi by Yes News Marathi
May 12, 2023
in इतर घडामोडी
0
‘शासन आपल्या दारी’ राज्यस्तरीय अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते साताऱ्यात होणार शुभारंभ
0
SHARES
1
VIEWS

मुंबई – सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत, त्यांना विविध योजनांचे लाभ मिळावेत यासाठी शासन थेट जनतेच्या दारी जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यात ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ उद्या (दि.१३ मे) सातारा जिल्ह्यातील दौलतनगर (ता.पाटण) येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे उपस्थित राहणार आहेत.

राज्यात ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत नागरिकांना विविध शासकीय योजनांचे लाभ आणि विविध महत्वाची कागदपत्रे एकाच ठिकाणी मिळणार आहेत. राज्यभर या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी मुख्यमंत्री सचिवालयात जनकल्याण कक्ष सुरु करण्यात आला आहे. या कक्षामार्फत राज्यातील अभियानाचे समन्वयन करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी या अभियानाचे प्रमुख आहेत. त्यांच्या माध्यमातून जिल्हा आणि तालुकास्तरावर देखील जनकल्याण कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक जिल्ह्यातून किमान ७५ हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ दिला जाणार आहे. यासाठी जिल्हा, तालुकास्तरावर २ दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

महारोजगार मेळावा, मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन
शासन आपल्या दारी’ अभियानाच्या शुभारंभाच्या निमित्ताने दौलतनगर येथे बेरोजगार युवक-युवतींकरिता ‘पंडीत दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. या परिसरातील युवावर्गाला ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या निमित्ताने रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी ‘मोफत महाआरोग्य शिबीर’ आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरातून गरजू रुग्णांच्या विविध आजारांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत.

‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या राज्यस्तरीय शुभारंभ कार्यक्रम, महारोजगार मेळावा आणि महाआरोग्य शिबिरास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Previous Post

दुचाकी वाहनांसाठी आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

दोनशेहून अधिक आमदार विजयी करण्यासाठी सज्ज व्हा – चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन

Related Posts

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे कडून खुशखबर..!
इतर घडामोडी

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे कडून खुशखबर..!

September 7, 2026
हिमनदी कोसळली तरी चीनचा मेगा धरण प्रकल्प थांबणार नाही? भारताची चिंता वाढली!
इतर घडामोडी

हिमनदी कोसळली तरी चीनचा मेगा धरण प्रकल्प थांबणार नाही? भारताची चिंता वाढली!

September 6, 2026
नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीवर तब्बल ₹35 हजार कोटींचा खर्च
इतर घडामोडी

नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीवर तब्बल ₹35 हजार कोटींचा खर्च

September 6, 2026
हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम
इतर घडामोडी

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..
इतर घडामोडी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..

September 5, 2026
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील
इतर घडामोडी

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026
Next Post
दोनशेहून अधिक आमदार विजयी करण्यासाठी सज्ज व्हा – चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन

दोनशेहून अधिक आमदार विजयी करण्यासाठी सज्ज व्हा - चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन

ताज्या बातम्या

सोलापूर महापालिकेत सचिन वाझे कोण ? अधिकाऱ्यांचा वरदहस्त…!

सोलापूर महापालिकेत सचिन वाझे कोण ? अधिकाऱ्यांचा वरदहस्त…!

September 7, 2026
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे कडून खुशखबर..!

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे कडून खुशखबर..!

September 7, 2026
सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई

सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई

September 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026