सोलापूर ते मुंबई पायी आलेल्या शिवसैनिकाचं मातोश्रीवर स्वागत

0
21

सोलापूर : सोलापूरहून पायी निघालेल्या शिवसैनिकाची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. उत्तम शिंदे हे ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्री निवासस्थानी आले होते. बाळासाहेबांनी ‘प्रति दादा कोंडके’अशी उत्तम शिंदे यांना संबोधले होते. २१ जुलै रोजी सोलापूरहून निघालेले शिंदे ३ ऑगस्टला मुंबईत पोहोचले. शुक्रवारी मातोश्रीवर ‘देव’दर्शन झाल्याची भावनाच त्यांनी लोकमत शी बोलताना बोलून दाखविली.

सोलापुरातील उळे येथे राहणारे उत्तम शिंदे हे लहानपणापासून शिवसैनिक आहेत. त्यांना प्रति दादा कोंडके म्हणून ओळखलं जातं. शिवसेनेच्या अनेक प्रचार सभामध्ये देखील उत्तम शिंदे दादा कोंडके यांच्या वेशात अनेक वेळा सहभागी झाले आहेत. अनेक वर्ष ज्या शिवसेनेत काम केलं ती शिवसेना दुभंगलेली पाहून मनाला वेदना होतात. सर्वसामान्य शिवसैनिकाची देखील हीच भावना आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे परत एकत्रित आले पाहिजेत. अशी प्रार्थना करण्यासाठी उत्तम शिंदे यांनी सोलापूर ते मुंबई असा पायी प्रवास पूर्ण केला.