रणजितसिंह डिसले यांचा राजीनामा अखेर नामंजूर; शिक्षण विभागाचे परिपत्रक जारी

0
12

सोलापूर : ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांना पुरस्कार प्रदान होऊन वर्षाचा कालावधी लोटला तरी कोणत्या ना कोणत्या कारणावरुन डिसले गुरुजी हे चर्चेत राहिलेले आहेतच.रणजितसिंह डिसले परदेशी शिष्यवृत्तीसाठी आपल्या शिक्षक पदाचा राजीनामा दिला होता. शिवाय प्रशासकीय यंत्रणा आणि डिसले गुरुजी यांच्यात सातत्याने मतभेद हे होतेच. त्यामुळे डिसले गुरुजी यांच्या राजीनाम्यानंतर काय होणार याकडे शिक्षण विभागाचे लक्ष लागले होते. अखेर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने यावर निर्णय घेतला आहे. प्रशासकीय कारणास्तव त्यांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांचे अध्यापनाचे कामकाज हे सुरुच राहणार आहे.