• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

वृक्षारोपणाचा स्वामी पॅटर्न “एक पद एक वृक्ष”

Yes News Marathi by Yes News Marathi
June 15, 2021
in मुख्य बातमी
0
वृक्षारोपणाचा स्वामी पॅटर्न “एक पद एक वृक्ष”
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर जिल्हा परिषद राबवणार वृक्षारोपणाची मोहिम

येस न्युज मराठी नेटवर्क : कोरोनाची पहिली लाट ओसरत असताना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा नोव्हेंबर 2020 मध्ये दिलीप स्वामी यांनी पदभार घेतला. पदभार घेतल्यापासून कोरोना प्रतिबंधासाठी सीईओ स्वामी यांनी अनेक उपक्रम राबविले. दुसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून “माझे गाव कोरोना मुक्त गाव” व “माझे दुकान माझी जबाबदारी” हे दोन अभियान सुरू केले.
नुकतेच राज्य शासनाने सीईओ स्वामी यांनी राबविलेले “गाव तिथे कोविड सेंटर” हे अभियान राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यानिमित्ताने सोलापूर पॅटर्न म्हणून या अभियानाचा गौरव झाला.
मान्सूनचे आगमन झाले की शासन स्तरावर व सामाजिक स्तरावर वृक्षारोपणाची लगबग सुरू होते. राज्यात दरवर्षी या कालावधीत लाखो वृक्षांचे रोपण केले जाते. परंतु मोठ्या प्रमाणात वृक्ष लावल्यानंतर सर्वच रोपे जिवंत राहतात असे नाही. रोपटे लावल्यानंतर त्याच्या संवर्धनाकडे वैयक्तिक लक्ष देवून संगोपन करणे आवश्यक आहे. यासाठी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्याऐवजी प्रत्येकाने एकच वृक्ष लावून त्याचे जतन करावे ही संकल्पना पुढे आली व त्यातूनच सीईओ स्वामी यांनी “एक पद एक वृक्ष” हे अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 24 जून पासून 30 जून पर्यंत हे अभियान सोलापूर जिल्ह्यात राबविले जाणार आहे. जिल्हा परिषद मुख्यालय, पंचायत समिती मध्ये पदाधिकारी,अधिकारी व कर्मचारी यांची संख्या 14000 होते. ग्रामपंचायतींमध्ये सरपंच अधिकारी व कर्मचारी संख्या 2000 असून मानधनावरील कर्मचारी संख्या 2000 असे एकूण 18000 एवढी संख्या होते. उर्वरित 2000 संस्था-पतसंस्था यांचेकडून लावण्यात येतील. एकंदरीत 20000 वृक्ष लागवड करून ते पुर्णपणे जगवले जातील. असे या उपक्रमाचे स्वरूप आहे.
या उपक्रमात पदाधिकारी अधिकारी यांनी त्यांचे त्यांचे मुख्यालयात जि प क्षेत्रात जमेल तेथे योग्य ठिकाणी रोपटे लावायचे आहे. प्रत्येक मुख्याध्यापक शिक्षक यांनी त्यांच्या शाळेच्या आवारात योग्य ठिकाणी वृक्षारोपण करावयाचे व नावाने ते जतन करायचे. आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या ठिकाणी वृक्षारोपण करावयाचे आहे. अंगणवाडी पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी अंगणवाडी परिसरात वृक्षारोपण करायचे आहे तर इतरांनी जागा उपलब्धतेप्रमाणे वृक्षारोपण करून ते जतन करायचे आहे. वृक्ष लागवडी नंतर प्रत्येक ठिकाणच्या वृक्षास अनुक्रमांक देऊन त्यांचे रक्षण व जतन करण्यासाठी अभिलेखे तयार करायचे आहेत. सामाजिक वनीकरण विभाग, वन विभाग व कृषी विभाग रोपे उपलब्ध करून देण्यासाठी मदत करणार असून वृक्षांच्या देखभालीसाठी या विभागांचे मार्गदर्शन लाभणार आहे. कोणी स्वयंस्फूर्तीने एकापेक्षा जास्त वृक्ष लावणार असतील तर त्याचे स्वागतच आहे परंतु वृक्षाची काळजी व संगोपन त्यांनी स्वतः करायचे आहे. 20 जून पर्यंत जिल्हाभर वृक्षलागवडीचा आराखडा पूर्ण करण्यात येणार आहे. जिल्हा मुख्यालय कृषी विकास अधिकारी व तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी हे नियोजनास मदत करतील. गटविकास अधिकारी यांनी समन्वय समितीची बैठक घेऊन सूक्ष्म नियोजन करावे असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेले आहेत.

Previous Post

बार्टीच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न

Next Post

काळे कपडे घालून मराठा आंदोलकांचा मूकमोर्चा सुरू… प्रकाश आंबेडकर, चंद्रकांत पाटील यांचाही सहभाग

Related Posts

अंत्रोळीकर नगरातील ६१ लाखांच्या विकासकामांचे आ.देवेंद्र कोठे यांच्या हस्ते भूमिपूजन
मुख्य बातमी

अंत्रोळीकर नगरातील ६१ लाखांच्या विकासकामांचे आ.देवेंद्र कोठे यांच्या हस्ते भूमिपूजन

August 3, 2026
पंढरपुरात विविध योजनांच्या 1 हजार 23 लाभांचे वितरण – तहसीलदार सचिन लंगुटे
मुख्य बातमी

पंढरपुरात विविध योजनांच्या 1 हजार 23 लाभांचे वितरण – तहसीलदार सचिन लंगुटे

August 3, 2026
देशभरातील एलपीजी (LPG) गॅस ग्राहकांसाठी मोठा इशारा.!
मुख्य बातमी

देशभरातील एलपीजी (LPG) गॅस ग्राहकांसाठी मोठा इशारा.!

August 3, 2026
आषाढी यात्रेत ‘लालपरी’ ठरली लाखो भाविकांची विश्वासाची सोबती
Blog

आषाढी यात्रेत ‘लालपरी’ ठरली लाखो भाविकांची विश्वासाची सोबती

August 2, 2026
पंढरपूर प्रमाणे आता अक्कलकोटलाही कॉरिडॉर..!
मुख्य बातमी

पंढरपूर प्रमाणे आता अक्कलकोटलाही कॉरिडॉर..!

August 1, 2026
जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे : मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन
मुख्य बातमी

जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे : मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

July 31, 2026
Next Post
काळे कपडे घालून मराठा आंदोलकांचा मूकमोर्चा सुरू… प्रकाश आंबेडकर, चंद्रकांत पाटील यांचाही सहभाग

काळे कपडे घालून मराठा आंदोलकांचा मूकमोर्चा सुरू… प्रकाश आंबेडकर, चंद्रकांत पाटील यांचाही सहभाग

ताज्या बातम्या

घरकुल योजनांच्या अंमलबजावणीत दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही; प्रत्येक आठवड्याला होणार प्रगतीचा आढावा : मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

घरकुल योजनांच्या अंमलबजावणीत दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही; प्रत्येक आठवड्याला होणार प्रगतीचा आढावा : मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

August 3, 2026
मोदी हुडको परिसरातील १५ वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या अखेर सुटली

मोदी हुडको परिसरातील १५ वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या अखेर सुटली

August 3, 2026
स्व. विष्णूपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ

स्व. विष्णूपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ

August 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026