• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पिकविमा योजनेच्या लाभापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या-कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे आदेश

Yes News Marathi by Yes News Marathi
September 25, 2021
in मुख्य बातमी
0
पिकविमा योजनेच्या लाभापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या-कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे आदेश
0
SHARES
0
VIEWS

पंढरपूर, दि. (25):- जिल्ह्यात पावसाने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. पीक विम्याबाबत योग्य पद्धतीने कार्यवाही करून एकही शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता संबंधितांनी घ्यावी, असे आदेश राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे दिले .

सांगोला तालुक्यातील अजनाळे येथे सोलापूर जिल्ह्यातील रिसोर्स फार्मर्स आणि पीक स्पर्धा विजेते शेतकरी यांच्यासोबत झालेल्या परिसंवादात ते बोलत होते. यावेळी आमदार शहाजी पाटील, पंचायत समिती सभापती राणीताई कोळवले, माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ, प्रबुद्धचंद्र झपके, प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर, तहसीलदार अभिजीत पाटील, विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी सर्जेराव तळेकर, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र पवार, शिवाजी शिंदे, संभाजी शिंदे ,भाऊसाहेब रुपनर आदी उपस्थित होते.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने फळ पीक विम्याची रक्कम देण्याबाबत विमा कंपन्यांनी कार्यवाही करावी. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. नुकसानग्रस्त एकही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही आदेश श्री . भुसे यांनी यावेळी दिले .

अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे द्राक्ष बागांचे नुकसान होऊ नये यासाठी कृषी विद्यापीठाला अभ्यास करण्याची जबाबदारी दिली जाईल. यावर शास्त्रीय आणि तांत्रिक पद्धतीने अभ्यास करून सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल. तसेच सांगोला तालुक्यात मोठ्या प्रमाणात डाळिंब उत्पादन घेतले जाते. डाळिंब पिकावर तेल्या, मर आणि कुजवा या रोगामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त पिकांची डाळिंब संशोधन केंद्राने पाहणी करावी. यावर कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, यासाठी शासनाकडून आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असेही आश्वासन कृषी मंत्री श्री .भुसे यांनी यावेळी दिले .

सांगोला तालुक्यातील अतिवृष्टी आणि तेल्या रोगामुळे नुकसान झालेल्या पिकांची शेतकऱ्यांना भरपाई मिळावी अशी मागणी आमदार शहाजी पाटील यांनी केली. तर सांगोला येथे मध्यवर्ती प्रयोगशाळा व्हावी अशी मागणी माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांनी केली. यावेळी पीक स्पर्धा विजेते शेतकऱ्यांचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

तत्पूर्वी कृषिमंत्री भुसे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेत पिकांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बामणी येथील शेतकरी सदाशिव साळुंखे यांच्या ड्रॅगन फ्रुट पिकाची पाहणी केली. तर यलमार मंगेवाडी येथे राजेंद्र यलपले यांच्या द्राक्ष बागेची पाहणी केली. तसेच अजनाळे येथील तेल्या, मर आणि कुजवा या रोगामुळे नुकसान झालेल्या डाळिंब पिकाची पाहणी करून याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

Previous Post

भीमा सीना जोड कालव्यासाठी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र प्राप्त

Next Post

सोलापूर जिल्ह्यातील सरपंच यांच्याशी साधला आॕनलाईन संवाद

Related Posts

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!
मुख्य बातमी

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

August 18, 2026
नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप
मुख्य बातमी

नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

August 17, 2026
किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!
मुख्य बातमी

किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!

August 17, 2026
ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

August 16, 2026
अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ
मुख्य बातमी

अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ

August 16, 2026
भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…
मुख्य बातमी

भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…

August 16, 2026
Next Post
सोलापूर जिल्ह्यातील सरपंच यांच्याशी साधला आॕनलाईन संवाद

सोलापूर जिल्ह्यातील सरपंच यांच्याशी साधला आॕनलाईन संवाद

ताज्या बातम्या

SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार

SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार

August 19, 2026
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार

August 19, 2026
पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!

पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!

August 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026