दक्षिण सोलापूर तालुक्याच्या तहसीलदार पदी किरण जमदाडे यांची शासनाने केली नियुक्ती….

0
52

सोलापूर : दक्षिण सोलापूर तहसीलदार पदी नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले किरण जमदाडे यांची नियुक्ती झाली आहे. यापूर्वी दक्षिण सोलापूर तहसीलदार पदी तहसीलदार उज्वला सोरटे यांची नियुक्ती झाली होती परंतु त्यांना मागील दोन महिन्यांपासून पदभार देण्यात आलेला नव्हता. जिल्हाधिकारी कार्यालयात मागील काही दिवस त्या चकरा मारत होत्या पण आता त्यांची बदली निवडणूक कार्यालय पुणे या ठिकाणी झाली आहे.

सोलापुरातील सर्वसाधारण शाखेच्या तहसीलदार अंजली कुलकर्णी यांची ही बदली झाली आहे. त्यांना पुणे येथे संजय गांधी निराधार योजनेच्या तहसीलदार पदी नियुक्ती देण्यात आली आहे. सोलापुरातील अप्परचिटणीस कुळ कायदा इथल्या सुनिता नेरलीकर यांची बदली कोल्हापूर या ठिकाणी जिल्हा पुरवठा सहाय्यक पदी करण्यात आली आहे.
तत्कालीन तहसीलदार अमोल कुंभार यांची बदली झाल्यानंतर दक्षिण तहसीलदार पदावर पूर्णवेळ अधिकारी देण्यात आला नव्हता. दरम्यानच्या काळात उज्वला सोरटे यांची नियुक्ती झाली मात्र त्यांना राजकीय विरोध झाल्याने त्या पदभार स्वीकारू शकल्या नाहीत. मंद्रूपचे अप्पर तहसीलदार राजशेखर लिंबारे यांच्याकडे तात्पुरता पदभार होता आता किरण जगदाडे यांच्या रूपात दक्षिण सोलापूर तालुक्याला पूर्ण वेळ तहसीलदार मिळाला आहे किरण जमदाडे हे उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा गावचे रहिवासी आहेत.