सोलापूर : सध्या जगभरात चर्चेत असलेल्या अँटीबॉडी कॉकटेल पद्धतीचा प्रयोग बार्शीत यशस्वी पार पडला आहे. सोलापूर जिल्ह्यात बार्शीतील डॉ. संजय अंधारे यांनी मोनोक्लोनल अँटीबॉडीजचा प्रयोग करत कोविड रुग्णांना २४ तासात बरे केल्याचा दावा केला आहे. राज्यातला हा पहिलाच प्रयोग असल्याचे बोलले जात आहे. सोलापूर बार्शीतील डॉ. अंधारे यांनी त्यांच्या सुश्रुत हॉस्पिटलमध्ये कोरोनावरील आधुनिक उपचार पद्धतीतील मोनोक्लोनल अँटीबॉडीज किंवा अँटीबॉडी कॉकटेलचा वापर केला आहे. ४ रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यापैकी चार रुग्णांवर हे औषध अंत्यत प्रभावी ठरल्याचा दावा संजय अंधारे यांनी केला आहे. बार्शीसारख्या ग्रामीण भागात अशा प्रकारे पहिल्यांदाच हा प्रयोग करण्यात आला आहे. इंजेक्शनची किंमत ६० हजाराच्या आसपास असली तरी त्रास कमी असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना दिलासा मिळत आहे.










