सोनी महाविद्यालयाचे बारावी परीक्षेत यश

0
26

सोलापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणेच्या वतीने फेब्रुवारी २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकालात देशभक्त हरिनारायण बंकटलाल सोनी महाविद्यालयाने यशाची परंपरा कायम ठेवली आहे. कॉमर्स व सायन्स विषयास विद्यार्थ्यांनी मोठे यश मिळविले आहे.

वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के लागला, झारा अफताब कारीगर (९७ टक्के), शुभम गणेश साळुंखे (९३.८३ टक्के), जान्हवी गिरीष हिद्दुगी (९३.१७ टक्के), आदित्य महादेव पुजारी (९२.१७ टक्के), वरुण रमेश दोडमनी (९०.१७ टक्के), आर्या प्रितम भांबुरे (९० टक्के) यांनी अनुक्रमे प्रथम

व्दितीय, तृतीय, चौथा, पाचवा क्रमांक मिळविला. सायन्स विभागात स्वर अभय कामतकर (९३.१७ टक्के), अश्विन अविनाश शिंदे (९०.६७ टक्के), शुभम अनिल सिंदगी (८७.५० टक्के), श्रुती संजय कळसगोंडा (८६.५० टक्के), रूग्वेद राहुल शेळके (८६.१७ टक्के) यांनी अनुक्रमे प्रथम, व्दितीय, तृतीय, चौथा, पाचवा क्रमांक मिळविला. यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत सोमाणी, सचिव आनंद भंडारी, सहसचिव मधुसूदन करवा, व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वासंती अय्यर , उपप्राचार्या हरदीप बोमरा व शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.