पिकनिक स्पॉट येथे वृक्षारोपण

0
18

सोलापूर – माझी वासुंधरा अभियान अंतर्गत आयुक्त यांच्या आदेशानुसार एन.सी.सी विद्यार्थी यांच्या माध्यमातून केगाव येथील मनपा मालकीच्या स्विमिंग टॅंक लेक पिकनिक स्पॉट साठी आरक्षित असलेल्या 47.55 एकर जागेमध्ये 50 वृक्षांचे वृक्षारोपण करणेत आले. तसेच या आधी लावण्यात आलेल्या वृक्षांना खत टाकण्यात आले. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्या हस्ते झाडं लावुन करण्यात आले. असुन सदर उपक्रमास NCC चे राजेंद्र चिपडे लेफ्टनंट कर्नल, हवालदार मादीयार, व उद्यान अधीक्षक निशिकांत कांबळे विभाग यांच्या समवेत वृक्षारोपण करण्यात आले.