छत्रपतीचे आदर्श विचार जोपासून गावातील जनतेसाठी युवकांनी काम करावे – माने

0
23

विधाता प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबीरात 135 जणाचा सहभाग

सोलापूर – शिवस्वराज्य दिन हा सार्वभौमत्वाचा, प्रेरणा देणारा दिवस असून छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श विचार घेऊन युवकांनी गावातील रयतेसाठी काम करण्याचे आवहान माजी आमदार दिलीपराव माने यांनी केले.

तेलगांव ता. उत्तर सोलापूर येथे शिवराज्याभिषेक दिन व विधाता प्रतिष्ठान नवव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भगवा स्वराज्य ध्वजारोहन पूजन माने यांचे हस्ते करण्यात आले.

छत्रपतीचे विचारामुळे आज महाराष्ट्र महान असून युवक ही खरी ताकद आहे. युवकांनी गावचे विकासासाठी तसेच जनतेच्या प्रश्नासाठी काम करणे आवश्यक असल्याचे माने यांनी सांगितले. तेलगांव येथील युवानेते सुदर्शन पाटील हे युवकांना एकत्रीत घेऊन विधाता प्रतिष्ठानचे वतीने दरवर्षी रक्तदान शिबीर व सामाजिक काम करत आहेत. त्यांचे कामाचे कौतुक माजी आमदार माने यांनी केले. या शिबीरात 135 जणांनी तर 9वर्षात 801 जणांनी रक्तदान केले.

यावेळी सरपंच रेवणसिध्द पुजारी, शिवाजी पाटील, नानासो जाधव, अजय सोनटक्के, किरण बंडगर, विठ्ठल गरड, दत्तात्रय जाधव, मालोजी पाटील जयानंद पाटील, यशवंत माने, अतुल पाटील, नवनाथ पाटील, गंगाधर बारडोळे, जगनाथ पाटील, प्रविन माने, समर्थ गुंड, आदिसह गावातील नागरीक, युवक उपस्थित होते. प्रास्ताविक संयोजक सुदर्शन पाटील यांनी केले. चंद्रसेन पाटील यांनी सुत्रसंचालन केले.