सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज शहरातील विविध भागांची पाहणी करून स्वच्छता, अतिक्रमण, व वाहतूक व्यवस्थापनासंदर्भात आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
या पाहणीदरम्यान आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी पदमशाली चौक, बालाजी मंदिर मागील परिसर, कुचन नगर नाला – दत्त नगर, तसेच पॉलिटेक्निक कॉलेज रोड परिसरातील परिस्थितीची पाहणी केली. रस्त्यांवर महिनोंमहिने पार्क करून ठेवलेल्या वाहनांवर कारवाई करण्याच्या दृष्टीने अशा वाहनधारकांना नोटिस देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाला दिले.




पॉलिटेक्निक कॉलेज परिसरातील रस्त्याच्या कडेला वाढलेले गवत तत्काळ काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले. तसेच हवामान केंद्र ते स्व. लिंगराज वल्याळ क्रीडांगण रस्ता या मार्गावरील गवत, झुडपे, आजोरा तसेच अतिक्रमणे तातडीने दूर करण्याचे निर्देश दिले.
स्व. लिंगाराज वल्याळ क्रीडांगण परिसरात स्वच्छता मोहीम राबवून मैदान व परिसर स्वच्छ ठेवण्याचे, तसेच वॉकिंग ट्रॅक आणि ओपन जिमची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले. डॉ. ओम्बासे यांनी जिल्हा नियोजन समितीकडून ओपन जिमसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून घेण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.
तसेच कर्णिक नगर ते वालचंद कॉलेज रोड या मार्गावर खाद्यपदार्थ विक्रेते व चायनीज गाड्या उभ्या करून वाहतुकीत अडथळा निर्माण करणाऱ्यांना नोटिस देऊन योग्य कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले. तसेच यावेळी मा. आयुक्त यांनी श्री मार्कंडेय जलतरण तलाव येते भेट देऊन पाहणी केली.




यावेळी त्यांनी मार्कंडेय उद्यानाची पाहणी करून उद्यान परिसरातील स्वच्छतेबाबत तसेच नागरिकांच्या सोयीसुविधा वाढविण्यासाठी आवश्यक ती कामे तातडीने हाती घेण्याच्या सूचना संबंधित विभागप्रमुखांना दिल्या.या पाहणीदरम्यान उपायुक्त तैमूर मुलाणी, सह.आयुक्त शशिकांत भोसले,अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी तसेच विभागीय अधिकारी, तसेच संबंधित विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

