- सोलापूर : जिल्हा परिषदेचे उपअभियंता सुनील कटकधोंड यांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता पदाचा सोमवारी १३ फेब्रु. रोजी पदभार घेतला. यापूर्वी त्यांनी दोन वर्ष हा पदभार सांभाळला आहे. तसेच बांधकाम कार्यकारी अभियंता पदाचा कार्यभार पाहिला आहे. आजपर्यंत कार्यकारी अभियंता पदावर केलेल्या कामाच्या जोरावरच त्यांनी पुन्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता पदाचा अतिरिक्त पदभार मिळवला आहे.
- पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, सोलापूर जिल्ह्यात 1019 ग्रामपंचायत आहेत, जलजीवन मिशनचा सुरुवातीला 946 गावांचा आराखडा तयार करण्यात आला. नंतर 855 गावांचा सुधारित आराखडा तयार झाला. सर्व 855 कामांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. आता 178 कामे नव्याने करण्यात येणार असून त्याला मार्च अखेर प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देणार आहे.
आमच्या समोर जिल्ह्यातील टंचाईचे आव्हान असते. जिल्ह्यातील 30 पैकी 20 प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना बंद आहेत. त्या योजना सोलर युनिटचा वापर करून सुरू करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला.
- एप्रिल ते जूनमध्ये जिल्ह्यातील 240 गावे टंचाई बाधित होऊ शकतात, त्यासाठी 161 टँकर व 103 विहिरी अधिग्रहण करण्याचे नियोजन असल्याची माहिती त्यांनी दिली. नमामी चंद्रभागा अभियानावर फोकस राहणार आहे. नदी काठची जी गावे आहेत, त्यागावातील दूषित पाणी नदी जाऊ नये यासाठी वॉटर ट्रीटमेंट प्लान्ट उभारण्यासाठी प्रयत्न राहील. यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे उपस्थित होते.