• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक

Yes News Marathi by Yes News Marathi
May 21, 2026
in Blog
0
सोलापूर जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक
0
SHARES
1
VIEWS

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली अक्कलकोट व चिंचोली MIDC मधील प्रश्नांवर चर्चा

सोलापूर — जिल्हा उद्योग मित्र समिती सभेची बैठक दि.20 मे रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस इंडस्ट्रियल असोसिएशन, अक्कलकोट रोड MIDC व चिंचोली MIDC चे सदस्य व अधिकारी तसेच महापालिका अधिकारी उपस्थित होते.

यावेळी इंडस्ट्रियल असोसिएशनच्या वतीने औद्योगिक वसाहतींमध्ये पायाभूत सुविधांची कमतरता असल्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या समोर मुद्दे मांडण्यात आले. विशेषतः अक्कलकोट MIDC मध्ये पाणीपुरवठा, खराब रस्ते, ड्रेनेज लाईन आणि रस्त्यावरील लाईट या प्रमुख समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले.

तसेच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये टेक्स्टाईल शाखा सुरू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. पाण्याच्या समस्ये संदर्भात महापालिका आयुक्तांच्या समवेत बैठक घेण्याबाबतही असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन विनंती केली.

दरम्यान, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेन यांनी औद्योगिक वसाहतीमध्ये आवश्यक सुविधा पुरविणाऱ्या महापालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करून येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा केली.

MIDC मधील रस्त्यांच्या कामांसाठी शासनाकडून 75 टक्के, महापालिकेकडून 12.5 टक्के आणि उर्वरित 12.5 टक्के हिस्सा जिल्हा नियोजन व विकास समितीद्वारे उपलब्ध करून देण्यास सुकाणू समितीने मागील बैठकीत मान्यता दिली होती. याबाबत अंमलबजावणी लवकरात लवकर करण्याचे निर्देश देण्यात आले.

अतिक्रमण काढण्याबाबत कडक कारवाईचे आदेश

एमआयडीसी परिसरातील अतिक्रमण काढण्याबाबत सूचना देण्यात आल्या. अतिक्रमण करणारे आणि त्यांना मदत करणारे या दोघांवरही कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले.

बैठक प्रत्येक महिन्याला घेण्याचे निर्देश

तसेच जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उमेशचंद्र दंडगव्हाळ यांना बैठक दर तीन महिन्यांनी न घेता प्रत्येक महिन्याला घेण्याबाबत सूचना देण्यात आली. प्रत्येक विभाग प्रमुखांनी एमआयडीसी संदर्भातील संबंधित अडचणींचा आढावा घेऊन पुढील पंधरा दिवसांच्या आत तो विषय बैठकीत मांडावा, अशा सूचना देण्यात आल्या.

यावेळी बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, पॉलीटेक्निक कॉलेज आर. व्ही. मुंडे, डायरेक्टर यंत्रमाग संघ नारायण आडकी, उपाध्यक्ष टेक्सटाईल फाउंडेशन सोलापूर जयंत श्री अकेन, जनसंपर्क अधिकारी टेक्स्टाईल फाउंडेशन सुजय निकते , इंडस्ट्रियल असोसिएशन सेक्रेटरी शिवशंकर आंधळकर, व्यवस्थापक सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन एस. बी. गायकवाड, एस.टी. राठोड प्रादेशिक अधिकारी एमआयडीसी एस.टी. राठोड. उप अभियंता बी.पी. खंदारे, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालक ओंकार चौरे, जिल्हा विकास व्यवस्थापक नाबार्ड नितीन शेळके, जिल्हा उद्योग केंद्र राजशेखर शिंदे, सीनियर कन्सल्टंट पुणे श्रीजीत नायर, जी.डी बाबर खादी ग्रामोद्योग मंडळ आदी महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post

बालाजी अमाईन्सच्या शेअरमध्ये आली तेजी…!

Next Post

युवकांचा अपमान सहन केला जाणार नाही! – युवा महासंघ

Related Posts

समृद्धी क्रीडा सेवा पुरस्कार जाहीर..खो-खोपटू रामजी कश्यप व जलतरणपटू श्रावणी सूर्यवंशी खेळाडू पुरस्काराचे मानकरी
Blog

समृद्धी क्रीडा सेवा पुरस्कार जाहीर..खो-खोपटू रामजी कश्यप व जलतरणपटू श्रावणी सूर्यवंशी खेळाडू पुरस्काराचे मानकरी

August 26, 2026
सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.
Blog

सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

August 25, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत
Blog

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
सोलापुरात माहेश्वरी प्रगती मंडळ युवती शाखेतर्फे ‘तीज री रीत’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत अखंड टीमवर्कचे दर्शन!
Blog

सोलापुरात माहेश्वरी प्रगती मंडळ युवती शाखेतर्फे ‘तीज री रीत’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत अखंड टीमवर्कचे दर्शन!

August 23, 2026
ऑफिसर्स क्लब भाडेकरार संशयाच्या भोवऱ्यात ! उपजिल्हाधिकाऱ्यांची मनमानी
Blog

ऑफिसर्स क्लब भाडेकरार संशयाच्या भोवऱ्यात ! उपजिल्हाधिकाऱ्यांची मनमानी

August 22, 2026
पुणे-सोलापूर महामार्गावर स्विफ्टचा अपघात; दोघे गंभीर
Blog

पुणे-सोलापूर महामार्गावर स्विफ्टचा अपघात; दोघे गंभीर

August 21, 2026
Next Post
युवकांचा अपमान सहन केला जाणार नाही! – युवा महासंघ

युवकांचा अपमान सहन केला जाणार नाही! - युवा महासंघ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026