सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन

0
16

सोलापुरात प्रथमच रणजी संघाचा सराव सोमवार पासून इंदिरा गांधी स्टेडीयम येथे प्रथमच महाराष्ट्र रणजी क्रिकेट खेळाडूचा सराव शिबीर पाच दिवस म्हणजे शुक्रवार पर्यंत असणार आहे. हा मान सोलापूरला प्रथमच मिळत आहे. या शिबिरात भारतीय आयपील तसेच रणजी क्रिकेट खेळाडूचा समावेश असणार आहे. मागील काही महिन्यात U/19 वर्षा आतील महाराष्ट्र विरुद्ध गोवा हा सामना झाला होता तो महाराष्ट्र संघाने जिकला होता त्या सामन्यात सोलापूरचा अर्शिन कुलकर्णी याची फटकेबाजी , यश बोरामणी यांची दमदार शतकी खेळी पहायला मिळाली होती. त्यानंतर U/25 वर्षाआतील महाराष्ट्र विरुद्ध सिक्किम क्रिकेट सामना आपल्या पार्क मैदानावरच झाला तो ही सामना महाराष्ट्र संघाने जिंकला.

आपल्या सुंदर आयोजन, नियोजनामुळे आपल्याला राज्य रणजी सराव शिबीर ची जबाबदारी सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोशिएशनला महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशने दीली त्याला कारणही तसेच आहे सुंदर स्टेडियम , जेवणाची व्यवस्था , उत्तम अशी राहण्याची व्यवस्था. रणजी सराव शिबीरासाठी सहभागी होणारे काही खेळाडू केदार जाधव , ऋतुराज गायकवाड , (भारतीय खेळाडू ) , अंकित बावणे , निखिल नाईक , विकी ओसवाल , प्रशांत सोळंकी, हांगेरीकर (सर्व आयपीएल खेळाडू )महत्वाचे म्हणजे आपल्या सोलापूरचा अर्शिंन कुलकर्णी. राज्य निवड समिती चे सदस्य सोलापूरचा माजी रणजी खेळाडू रोहित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर पार पडणार आहे. हे शिबीर पार पाडण्यासाठी चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील, धैर्यशिल मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रकांत रेंबूर्सू , प्रकाश भुतडा , संतोष बडवे , शिवा अकलूजकर ,राजेंद्र गोटे सर संघटनेचे सर्व कार्यकारणी सदस्य , सभासद परिश्रम घेत आहेत. सोलापूरकरांना सराव स्टेडीयम वरून पाहण्यास सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत मिळेल.