सोलापूरकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. ज्या विमानसेवेचे स्वप्न सोलापूरकर बघत आहेत ते अवघ्या महिनाभरावर आले आहे. दिल्लीमध्ये आज विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोलापूरच्या विमानसेवेबाबत बैठक घेतली. या बैठकीस भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, तसेच चार विमान कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. डीजीसीए कडून सोलापूर विमानतळासाठी उद्या किंवा परवा पर्यंत लायसन्स मिळणार आहे. 26 सप्टेंबर रोजी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूरसह देशातील सात विमानतळाचे उद्घाटन करणार आहेत. सोलापूर – हैदराबाद, सोलापूर – पुणे, सोलापूर- गोवा, सोलापूर- मुंबई, या ठिकाणी विमानसेवा नोव्हेंबर महिन्यात सुरू होईल असे प्रयत्न सुरू आहेत. सोलापुरातून व्यावसायिक विमानसेवा तसेच उडान योजनेतील कमी तिकीट असलेली विमानसेवा सुरू होणार आहे. अशी माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी Yes News मराठी शी बोलताना दिली..