सोलापूर : खंडणी मागणे, सरकारी नौकर काम करताना दमदाटी करणे आदी गुन्हे दाखल असलेल्या सैपन अमिनसाब शेख (वय ५० रा. नानी मंजिल, कुर्बान हुसेन नगर, उत्तर सदर बझार) यास पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांनी, सोलापूर व धाराशीव या दोन जिन्ह्यातुन दोन वर्ष तडीपार केले आहे. सैपन शेख याच्याविरूध्द खंडणी मागणे, सरकारी नोकर काम करित असताना त्यांना दमदाटी करणे या सारखे गुन्हे दाखल असल्याने त्यांच्याविरूध्द सदर बझार पोलिस ठाण्याकडून तडीपार प्रस्ताव पोलिस उपायुक्त (परिमंडळ) यांना सादर करण्यात आला होता. पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांनी कारवाई करून सैपन शेख यांस सोलापूर व धाराशीव या दोन जिल्ह्यातुन दोन वर्षाकरिता तडीपार केले आहे.