• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयास युवा महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपद…

Yes News Marathi by Yes News Marathi
October 10, 2025
in इतर घडामोडी
0
बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयास युवा महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपद…
0
SHARES
1
VIEWS

संगमेश्वर कॉलेज दुसरे तर केबीपी पंढरपूरला तिसरे बक्षीस!

सांगोला, दि. 10- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 21 व्या युवा महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपदाचे प्रथम पारितोषक बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाने पटकावले. दुसऱ्या क्रमांकाचे सर्वसाधारण विजेतेपद सोलापूरच्या संगमेश्वर कॉलेजला मिळाले. तर तिसरे पारितोषिक पंढरपूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाने पटकावले.

सांगोला येथील सांगोला महाविद्यालय, सांगोला येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा 21 वा युवा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. शुक्रवारी पारितोषिक वितरण झाले. समारोप समारंभास  ज्येष्ठ सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम झाला. यावेळी प्र-कुलगुरू प्रा.लक्ष्मीकांत दामा,  सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड, सचिव उदयबापू घोंगडे, विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले, व्यवस्थापन परिषदेचे सचिन गायकवाड, डॉ. प्रभाकर कोळेकर, डॉ. वीरभद्र दंडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे, महोत्सव समिती सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पार पडला. विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.

ललित विभागाचे विजेतेपद संगमेश्वर कॉलेजने पटकावले. वांग्मय विभागाचे विजेतेपद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अधिविभाग आणि कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूरला मिळाले. नाट्य विभागाचे विजेतेपद संगमेश्वर महाविद्यालयाने प्राप्त केले. संगीत विभागाचे सर्वसाधारण विजेतेपद शिवाजी कॉलेजला मिळाले. लोककला विभागाचे विजेतेपद शिवाजी महाविद्यालय बार्शी यांना देण्यात आले. नृत्य विभागाचे विजेतेपद एन. बी. नवले सिंहगड कॉलेज केगाव आणि सांगोला महाविद्यालय सांगोला यांना विभागून देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि पारितोषिकाचे वाचन डॉ. यशपाल खेडकर यांनी केले.


गोल्डन गर्लचा किताब सई दरेकर आणि स्नेहल विधाते यांना, बार्शीचा प्रेम सरोदे गोल्डन बॉय!
युवा महोत्सवात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनीस गोल्डन गर्ल तर विद्यार्थ्यास गोल्डन बॉयचा किताब दिला जातो. यंदाच्या गोल्डन गर्लचा किताब समान गुण मिळाल्याने विभागून देण्यात आले. संगमेश्वर कॉलेजची सई दरेकर आणि बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाची विद्यार्थिनी स्नेहल विधाते यांनी पटकाविला. मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.


युवा महोत्सवातून ऊर्जा, दिशा मिळते: मकरंद अनासपुरे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि सांगोला महाविद्यालयाने आज येथे उत्कृष्ट अशा युवा महोत्सवाचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. अशा युवा महोत्सवामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा मिळण्याबरोबरच एक प्रकारची ऊर्जा प्राप्त होते. मी देखील युवा महोत्सवामधूनच घडलो आहे, असे प्रतिपादन अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले. आयुष्यात यशासाठी कष्ट फार महत्त्वाचे असतात. केवळ रिल्स बनवून शॉर्टकट यश मिळवण्यापेक्षा कायम टिकणारे यश मिळवून आयुष्यात रियल बनावे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. समाज व देशासाठी काम करावे असे आवाहन करण्याबरोबरच त्यांनी मातृभूमी व आपल्या भाषेवर प्रेम करण्याचा आग्रह केला.

यावेळी बोलताना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे विद्यार्थी आज सांस्कृतिक क्षेत्रात राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी केली आहे. चांगले यश मिळवले आहेत. आज सांगोला महाविद्यालयाने या महोत्सवाचे यजमानपद स्वीकारून अतिशय उत्कृष्टरित्या विद्यार्थी कलाकारांची सोय केली. या संस्थेने उत्कृष्ट यजमानपदाचा एक आदर्श नमुना घालून दिला आहे. विद्यापीठ आज सर्व क्षेत्रात प्रगती करत असताना पाच लाख वृक्ष लागवड करण्याचा संकल्प करून जवळपास सव्वा लाख झाडे विद्यापीठ कॅम्पस मध्ये लावली आहेत. सर्व महाविद्यालयांनी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.


पुढील वर्षाचा 22 युवा महोत्सव सिंहगड कॉलेजमध्ये
21 व्या युवा महोत्सवाच्या समारोप कार्यक्रम प्रसंगी सिंहगड कॉलेजची विद्यार्थिनी गौरी शिंदे हिने युवा महोत्सव विषयी मनोगत व्यक्त करताना म्हणाली की, सांगोला महाविद्यालयाने अतिशय उत्कृष्टरित्या युवा महोत्सवाचे आयोजन करून विद्यार्थी कलाकारांची चांगली सोय केली, त्याबद्दल आभार. काहीजण कुजबूज करत असतात मात्र नियोजन करणाऱ्यांनाच कष्टाची माहिती असते. पुढच्या वर्षाच्या युवा महोत्सवाची जबाबदारी विद्यापीठाने सिंहगड कॉलेजवर सोपविल्यास आमच्या संस्थेचे सचिव संजय नवले यांनी ते निश्चितपणे पार पाडतील, असा विश्वास व्यक्त केला. त्यानंतर कुलगुरू डॉ. महानवर यांनी पुढच्या वर्षाच्या आयोजनाबद्दल चिंता मिटल्याचे जाहीर केले. त्यावेळी व्यासपीठावर येऊन संजय नवले यांनी पुढील वर्षी युवा महोत्सव आम्ही घेऊ, असे जाहीर केले.

Previous Post

भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सोलापुरात दोन दिवस सांस्कृतिक कार्यक्रम ! ” राष्ट्रग्रंथ – आधारस्तंभ लोकशाहीचा ” आणि ” गौरव गाथा संविधानाची ” नाटकांचे होणार सादरीकरण !

Next Post

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बंजारा समाजाच्या आंदोलन स्थळी भेट देऊन जाहीर पाठिंबा व्यक्त केला.

Related Posts

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा
इतर घडामोडी

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!
इतर घडामोडी

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन
इतर घडामोडी

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

October 12, 2026
साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक
इतर घडामोडी

साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक

October 12, 2026
एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे
इतर घडामोडी

एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे

October 12, 2026
Next Post
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बंजारा समाजाच्या आंदोलन स्थळी भेट देऊन जाहीर पाठिंबा व्यक्त केला.

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बंजारा समाजाच्या आंदोलन स्थळी भेट देऊन जाहीर पाठिंबा व्यक्त केला.

ताज्या बातम्या

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026