• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शिवसंपर्क अभियानातून शिवसेना करणार पक्षाची मोर्चेबांधणी

Yes News Marathi by Yes News Marathi
July 12, 2021
in मुख्य बातमी
0
शिवसंपर्क अभियानातून शिवसेना करणार पक्षाची मोर्चेबांधणी
0
SHARES
1
VIEWS

शिवसेनेच्या बैठकीत निर्णय

सोलापूर : शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून शिवसेनेचे पदाधिकारी थेट शाखाप्रमुख, शिवसैनिकांशी भेटून संवाद साधणार आहेत. यातून पक्षाची मोर्चेबांधणी शिवसेना करणार आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार १२ ते २४ जुलै दरम्यान हे अभियान चालणार आहे. याबाबतचा निर्णय रविवारी शासकीय विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत करण्यात आला.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे म्हणाले, शिवसेनेची पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी शिवसंपर्क अभियानाची आखणी करण्यात आली आहे. शिवसेनेप्रणित युवा सेना, कामगार सेना, महिला आघाडी, रिक्षा सेना अशा सर्व संघटना मजबूत करणे याला या अभियानात सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. शहरात प्रत्येक प्रभागात तर ग्रामीण भागात प्रत्येक पंचायत समिती गणात बैठका आयोजित करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. आगामी महापालिका, पंचायत समित्या, विधानसभा अशा सर्व निवडणुकांत शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिकांनी शिवसंपर्क अभियान जोरदारपणे राबवावे असे आवाहनही जिल्हाप्रमुख बरडे यांनी केले.

जिल्हाप्रमुख गणेश वानकर म्हणाले, पदाधिकाऱ्यांनी शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून शिवसैनिकांशी संवाद साधत जनतेच्या अडचणी समजून घ्याव्यात. त्यावर उपाय योजना करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जातील असा शब्द स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी अधिकाधिक संपर्क करावा असे आवाहनही जिल्हाप्रमुख वानकर यांनी यावेळी केले.

शहर प्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर म्हणाले, शिवसंपर्क अभियान हे पक्षाला आणखी बळ देणारे अभियान ठरणार आहे. शिवसेनेचे मुख्यमंत्री असलेले सरकार राज्यात करत असलेल्या विकासकामांची, जनतेसाठी घेत असलेल्या निर्णयांची माहिती शिवसैनिकांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचवावी. नव्या आणि जुन्या शिवसैनिकांशी संपर्क करून त्यांना पक्ष कार्याशी जोडण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही शहरप्रमुख श्री. धुत्तरगावकर यांनी केले.

यावेळी महापालिका विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, अमर पाटील, विष्णू कारमपुरी, संतोष पाटील, अक्कलकोट तालुका प्रमुख संजय देशमुख आदींनी मनोगत व्यक्त केले. या बैठकीस महापालिका विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, अमर पाटील, विष्णू कारमपुरी, संतोष पाटील, नगरसेवक भारतसिंग बडुरवाले, महेश धाराशिवकर, विजय पुकाळे, निरंजन बोद्धूल, परिवहन समिती सदस्य बाळासाहेब गायकवाड, लहू गायकवाड, सुरेश जगताप, अक्कलकोट तालुका प्रमुख संजय देशमुख, दक्षिण सोलापूर तालुका प्रमुख योगीराज पाटील, युवासेनेचे विठ्ठल वानकर, अक्कलकोट शहरप्रमुख योगेश पवार, अंत्रोळीच्या सरपंच कोमल करपे, उपशहरप्रमुख धनराज जाधव, मलिक हब्बू, चंद्रकांत मानवी, रेवण बुक्कानुरे, सोमनाथ शिंदे, वैद्यकीय सहायता कक्षाचे अतुल भंवर व रविकांत गायकवाड, रविकांत कांबळे, उज्वल दीक्षित, सचिन गंधुरे, आनंद मुसळे, बालाजी चौगुले, मनिष काळजे, बसवराज जमखंडी आदी उपस्थित होते.

तब्बल ५० बैठकांचे नियोजन
सोलापूर शहरातील २६ प्रभागांच्या २६ बैठका तसेच दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट येथील प्रत्येकी १२ पंचायत समिती गणांच्या २४ अशा एकूण तब्बल ५० बैठकांचे नियोजन यावेळी करण्यात आले. या बैठकांमुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांत उत्साह संचारला आहे.

Previous Post

पद्म पुरस्कारांसाठी 15 सप्टेंबरपर्यंत नामांकन पाठवा; पंतप्रधान मोदींचे देशवासियांना आवाहन

Next Post

36 जिल्हात “एक आठवण आठवण आपल्या दारी” उपक्रम

Related Posts

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..
मुख्य बातमी

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..
मुख्य बातमी

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026
तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!
मुख्य बातमी

तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!

August 7, 2026
‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
मुख्य बातमी

‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

August 6, 2026
आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन
मुख्य बातमी

आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन

August 6, 2026
भावसार व्हिजन इंडिया, सोलापूर सेंट्रलतर्फे महिलांसाठी मोफत ‘पिंक ओपीडी’ आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न
मुख्य बातमी

भावसार व्हिजन इंडिया, सोलापूर सेंट्रलतर्फे महिलांसाठी मोफत ‘पिंक ओपीडी’ आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

August 6, 2026
Next Post
36 जिल्हात “एक आठवण आठवण आपल्या दारी” उपक्रम

36 जिल्हात "एक आठवण आठवण आपल्या दारी" उपक्रम

ताज्या बातम्या

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026
सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रकमधून तब्बल ६.५४ कोटींचा गांजा जप्त

सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रकमधून तब्बल ६.५४ कोटींचा गांजा जप्त

August 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026