• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

विजापूर नाक्‍याचे वरिष्ठ PI उदयसिंह पाटील निलंबित!

Yes News Marathi by Yes News Marathi
November 2, 2021
in मुख्य बातमी
0
विजापूर नाक्‍याचे वरिष्ठ PI उदयसिंह पाटील निलंबित!
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : विजापूर रोडवरील नागेश ऑर्केस्ट्रा बार निर्बंध असतानाही सुरू राहिला कसा आणि त्याची माहिती तुम्हाला का नव्हती, असा जाब विचारत पोलिस आयुक्‍त हरीश बैजल यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील यांच्यावर ठोस कारवाई करत त्यांना थेट निलंबितच केले आहे. तर डीबी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ यांच्यासह आठ जणांना मुख्यालयात आणले आहे.

विजापूर नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील व डीबी पथकाचे प्रमुख शीतलकुमार कोल्हाळ यांची पोलिस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षाला तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यात डीबी पथकातील राजकुमार तोळनुरे, श्रीरंग खांडेकर, पिंटू जाधव, शिवानंद भीमदे, अंबादास गड्डम, अतिश पाटील, इम्रान जमादार व राठोड या आठ पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पोलिस आयुक्त हरीश बैजल यांनी अचानक केलेल्या तडकाफडकी बदल्यांमुळे शहर पोलिस आयुक्तालयात खळबळ उडाली आहे.

30 ऑक्‍टोबर रोजी रात्री विजापूर रोडवरील नागेश डान्स बारवर सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. प्रीती टिपरे यांनी कारवाई केली होती. त्यात जवळपास 39 जणांवर कारवाई करण्यात आली. डान्स बारमध्ये सुरू असलेले अश्‍लील नृत्य व ग्राहकांची गर्दी पाहून त्यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मदतीसाठी बोलावले होते. तरीही, डॉ. प्रीती टिपरे या स्वतः जाऊन डान्स बारवर कारवाई केली. कारवाईनंतर डॉ. प्रीती टिपरे यांनी कारवाईची माहिती पोलिस आयुक्‍त बैजल यांना दिली. त्यानंतर पोलिस आयुक्‍त बैजल यांनी ही कारवाई केल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले.

कामात हलगर्जीपणा चालणार नाही!
सर्वसामान्यांची सेवा करताना पोलिसांनी तत्पर राहायला हवे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून निर्बंध कायम आहेत. तरीही, विजापूर रोडवरील नागेश ऑर्केस्ट्रा बार सुरू राहिला. सहाय्यक पोलिस आयुक्त कारवाई करतात पण, तेथील स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांना माहिती होत नाही, हे दुर्दैव आहे. त्यामुळेच ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिस आयुक्‍त बैजल यांनी स्पष्ट केले. अवैध व्यवसायात भागीदारी अथवा संबंध, कामात हयगय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

Previous Post

वीज सवलत मागणीसाठी प्रस्ताव सादर करावेत

Next Post

मतदार नोंदणीबाबत विशेष अभियान

Related Posts

TOP 25 । टीईटी पेपर फुटी नंतर आता केंद्रप्रमुख परीक्षेवर संशयाचे ढग…
मुख्य बातमी

TOP 25 । टीईटी पेपर फुटी नंतर आता केंद्रप्रमुख परीक्षेवर संशयाचे ढग…

June 28, 2026
“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”
मुख्य बातमी

“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”

June 27, 2026
TOP 25 । आषाढीवारीच्या टेंडर प्रकरणावरून झेडपीत अधिकाऱ्याला शिवीगाळ…
मुख्य बातमी

TOP 25 । आषाढीवारीच्या टेंडर प्रकरणावरून झेडपीत अधिकाऱ्याला शिवीगाळ…

June 27, 2026
TOP 25 । सोलापूरच्या विमानसेवेच्या अडथळ्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक… पुन्हा चिमणी अन् नाईट लँडिंग
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूरच्या विमानसेवेच्या अडथळ्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक… पुन्हा चिमणी अन् नाईट लँडिंग

June 26, 2026
घर भेट दरम्यान नागरिकांनी बीएलओ ना घरातील व्यक्तींची माहिती देऊन सहकार्य करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
मुख्य बातमी

जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांच्याकडून शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाबाबत आढावा

June 26, 2026
आषाढी यात्रेतील भाविकांच्या सुविधांसाठी सर्व कामांना सर्वसाधारण सभेची मंजुरी
मुख्य बातमी

आषाढी यात्रेतील भाविकांच्या सुविधांसाठी सर्व कामांना सर्वसाधारण सभेची मंजुरी

June 26, 2026
Next Post
मतदार नोंदणीबाबत विशेष अभियान

मतदार नोंदणीबाबत विशेष अभियान

ताज्या बातम्या

करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण

करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण

June 28, 2026
आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे

आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
सोलापूर महानगरपालिकेच्या पल्स पोलिओ अभियानाचा शुभारंभ

सोलापूर महानगरपालिकेच्या पल्स पोलिओ अभियानाचा शुभारंभ

June 28, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026