सोलापूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्य दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी या परिक्षेत कु. स्नेहा सुनिल पुळुजकर ह्या उत्तीर्ण झालेल्या असून त्यांची न्यायाधीश पदी निवड झाली आहे.
- सोलापूर येथील सेवासदन प्रशालेतून दहावी तर दयानंद महाविद्यालयातून बारावी विज्ञान शाखेतून शिक्षण पूर्ण केले. तसेच त्यांनी ऑर्कीड अभियांत्रिकी कॉलेजमधून BE (E&TC) ही पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी दयानंद लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी (LLB) पूर्ण केली व सोलापूर विद्यापिठातून गोल्ड मेडल मिळवून त्यांनी एल. एल. एम. पूर्ण केले.
- कु. स्नेहा यांचे वडिल सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शिपाई पदावर कार्यरत आहेत. तसेच त्यांची आई जिल्हा क्षयरोग केंद्रात कक्षसेविका या पदावर आहेत. त्यांनी अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून मुलीला शिकवले आहे
- कु. स्नेहा था अॅड. श्री. ए. बी. अंदोरे यांच्याकडे ज्युनिअर म्हणून काम पाहत होत्या. तसेच त्यांना या परिक्षेसा अॅड. श्री. सत्यनारायण माने व अॅड. श्री गणेश पवार सर थांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल सर्वस्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. ▸ सदर पत्रकार परिषदेस श्री. किरण फडके, श्री. सुनिल पुळुजकर, सौ. उज्वला गावडे – पुळुजकर व अॅड. सुयश पुळुजकर उपस्थित होते.