पडसाळी गावच्या सरपंच पदी समाधान रोकडे यांची निवड

0
30

येस न्युज मराठी नेटवर्क : उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळी गावच्या सरपंच पदी आज निवड करण्यात आली.ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2020 मध्ये पडसाळी ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात आली होती.एकूण 9 सदस्य असणाऱ्या या बॉडीत अनुसूचित जाती साठी सरपंच आरक्षित निघाले होते.सरपंच पदाच्या उमेदवारी साठी दोन अर्ज आले होते।यामध्ये धर्मा रोकडे व समाधान रोकडे असे दोघाचे अर्ज होते अगोदर सरपंच पद कोणाला यासाठी चिठ्ठी काढण्यात आली.या मध्ये धर्मा रोकडे यांची चिठ्ठी निघाल्याने त्यांना अगोदरचे अडीच वर्षे सरपंच देण्यात आले.परंतु त्यांचे दिर्घ आजाराने निधन झाले त्यामुळे सरपंच पद रिक्त झाल्याने निवडणूक होऊन यामध्ये समाधान रोकडे 65 मतांनी निवडणूक लढवून निवडून आले।आज त्याची सरपंचपदी वडाळा मंडळ अधिकारी अविनाश गायकवाड, निवडणूक शाखेचे मल्लिकार्जुन लकडे ग्रामसेवक भालचंद्र निंबर्गी ,गावकामगार तलाठी सुवर्णा देवगण यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली.यावेळी येथे उपस्थित ग्रामपंचायत उपसरपंच सिमींताबाई भोसले,ज्योतिराम पाटील,सुधाकर सिरसट,राजेंद्र सिरसट,प्रभाकर सिरसट,ग्रामपंचायत सदस्य महादेव भोसले,आनंद दुधाळे,अजित सिरस ट ज्योत्स्ना पाटील,रेणूका आदलिंगे,तबसूम शेख,ग्रामपंचायत कर्मचारी गुरुबा भोसले,वैशाली सिरसट ,संतोष मोरे,देविदास पवार व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते