सोलापुरातील महिलांना सेफ वातावरणात एन्जॉय करता यावं यासाठी स्पाईस एन आईस इव्हेंट्स ची कायम धडपड असते.त्यांच्या लेडीज स्पेशल फ्रेंडशिप डे पार्टीचं हे 10 वं वर्ष आहे. स्पाईस एन आईस इव्हेंट्स महिलांसाठी नेहमीच काही ना काही उत्तम उपक्रम घेऊन येतात.
याच उद्देशाने गेल्या 10 वर्षांपासून लेडीज स्पेशल फ्रेंडशिप पार्टीचं आयोजन केलं जात आहे. या पार्टीला दरवर्षी अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो. महिलांना आपल्या मैत्रीणींबरोबर एंजॉय करण्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. अतिशय माफक एन्ट्री फी, डान्स फ्लोअर, म्युझिक आणि अनलिमिटेड फूड यामुळे ही पार्टी महिलांच्या एक नंबर पसंतीची ठरली आहे .
रविवारी 4 ऑगस्टला जी पार्टी झाली त्यात कॉलेजमधील मुली, महिला तसेच सिनियर महिलांनी देखील हजेरी लावली होती. सर्व महिलांनी अतिशय आनंदाने एन्जॉय केलं आणि सेफ वातावरणात मनमोकळेपणाने फ्रेंडशिप डे साजरा करायला मिळाला अशा भावना व्यक्त केल्या.सोलापुरातील मुली आणि महिला म्हणत आहेत क्वीन्स क्लब ची लेडीज स्पेशल फ्रेंडशिप डे पार्टी आहे सगळ्यात बेस्ट आयोजनासाठी स्पाईस एन आईस इव्हेंट्स चे महिलांनी मानले पुन्हा पुन्हा आभार