• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा बुधवारी एकोणिसावा दीक्षांत समारंभ!

Yes News Marathi by Yes News Marathi
February 18, 2024
in इतर घडामोडी
0
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा बुधवारी एकोणिसावा दीक्षांत समारंभ!
0
SHARES
1
VIEWS

9 हजार 943 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान होणार
46 संशोधकांना पीएच.डी पदवी तर 59 सुवर्णपदकाचेही वितरण होणार

सोलापूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा एकोणिसावा दीक्षांत समारंभ बुधवार, दि. 21 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी अकरा वाजता विद्यापीठाच्या दीक्षांत मैदानात होणार असून यावेळी एकूण 9 हजार 943 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. याचबरोबर 46 संशोधक विद्यार्थ्यांना पीएच. डी पदवी तर 59 विद्यार्थ्यांना सुवर्णपदके देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती श्री रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होणार आहे. राज्यपाल महोदय हे ऑनलाईन माध्यमातून या सोहळ्यासाठी जोडले जाणार आहेत. या समारंभास प्रख्यात निवृत्त प्राध्यापक तथा पद्मविभूषण प्रा. एम. एम. शर्मा आणि सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी  यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. प्रशासकीय इमारतीपासून ते दीक्षांत मंडपापर्यंत दीक्षांत मिरवणूक निघणार आहे. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. मलिक रोकडे हे ज्ञानदंड हाती घेऊन मिरवणुकीच्या अग्रभागी असणार आहेत. त्यानंतर प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात होईल. या समारंभात वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, मानवविज्ञान विद्याशाखा, आंतर विद्याशाखा, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना पदवी देऊन सन्मानित करण्यात येईल. 

यावर्षी 46 विद्यार्थ्यांना पीएच.डी पदवी प्रदान केली जाणार आहे. त्याचबरोबर यंदा 59 विद्यार्थी सुवर्णपदकाचे मानकरी ठरले आहेत. विविध विषयात गुणानुक्रमे प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना देणगीदारांनी दिलेल्या रकमेतून सुवर्णपदक देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला जातो. अशा एकूण 59 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देऊन सन्मानित केले जाणार आहे.

दीक्षांत समारंभाचा कार्यक्रम झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वाटप केले जाणार आहे. यासाठी विद्यापीठ परीक्षा विभागाने खास सोय केलेली आहे.

या पत्रकार परिषदेस प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. मलिक रोकडे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. देवानंद चिलवंत आदी उपस्थित होते.


पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास ‘उपरणे’
दीक्षांत समारंभात पदवी घेणारे स्नातक आणि पदवी प्रदान करणाऱ्या मान्यवरांना आता खास उपरणे राहणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार विद्यापीठ प्रशासनाने गटित समितीच्या शिफाशीनुसार यंदाच्या वर्षापासून दीक्षांत सोहळ्यासाठी नवा खास पिवळ्या रंगाचा व विद्यापीठ लोगो आणि अहिल्यादेवींचा फोटो असलेले खास उपरणे तयार केले आहे. हे उपरणे गळ्यात घालून विद्यार्थी यंदाच्या सोहळ्यात पदवी स्वीकारणार आहेत.

Tags: Convocation ceremonyPunyashlok Ahilya Devi Holkar Solapur UniversityWednesday
Previous Post

प्रभाग 26 मधील समर्थ सोसायटी सोरेगाव येथे ड्रेनेज कामाचे उद्घाटन

Next Post

प्रधानमंत्री उच्च शिक्षा अभियानातून सोलापूर विद्यापीठात 100 कोटी निधी मंजूर

Related Posts

हिमनदी कोसळली तरी चीनचा मेगा धरण प्रकल्प थांबणार नाही? भारताची चिंता वाढली!
इतर घडामोडी

हिमनदी कोसळली तरी चीनचा मेगा धरण प्रकल्प थांबणार नाही? भारताची चिंता वाढली!

September 6, 2026
नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीवर तब्बल ₹35 हजार कोटींचा खर्च
इतर घडामोडी

नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीवर तब्बल ₹35 हजार कोटींचा खर्च

September 6, 2026
हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम
इतर घडामोडी

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..
इतर घडामोडी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..

September 5, 2026
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील
इतर घडामोडी

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026
महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

September 5, 2026
Next Post
प्रधानमंत्री उच्च शिक्षा अभियानातून सोलापूर विद्यापीठात 100 कोटी निधी मंजूर

प्रधानमंत्री उच्च शिक्षा अभियानातून सोलापूर विद्यापीठात 100 कोटी निधी मंजूर

ताज्या बातम्या

‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

September 6, 2026
महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

September 6, 2026
भारत ही बुद्धांची भूमी; सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य चर्चेत

भारत ही बुद्धांची भूमी; सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य चर्चेत

September 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026