पुल्ली कन्या प्रशालेचा दहावीचा निकाल 92.10%

0
22

गुणवंत विद्यार्थींनी सत्कार सोहळा संपन्न

सोलापूर : पद्मशाली शिक्षण संस्था संचलित भू म पुल्ली कन्या प्रशालेचा मार्च 2022 इयत्ता दहावीचा निकाल 92.10% इतका लागला. एकूण 266 विद्यार्थिनी परीक्षेसाठी प्रविष्ट झाल्या त्यापैकी 245 विद्यार्थिनींनी यश संपादन केले. सृष्टी तेलंग हिने 90.40 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला . रमा यंगलदास 88.20% द्वितीय क्रमांक तर वैष्णवी बुरा 88% तृतीय क्रमांक पटकाविले.

35 विद्यार्थिनींनी विशेष प्राविण्य प्राप्त केले तर 83 विद्यार्थिनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या. पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष काशिनाथ गड्डम, उपाध्यक्ष प्रा. श्रीनिवास कोंडी , सचिव दशरथ गोप , सहसचिवा संगीता इंदापुरे , खजिनदार नागनाथ गंजी यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले. संस्थेचे विश्वस्त पांडुरंग दिड्डी, विजयकुमार गुल्लापल्ली यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थिनींचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आले. मुख्याध्यापिका गीता सादुल यांनी प्रस्ताविकातून कोविडच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाइन व ऑफलाईन शिक्षणाचा आधार घेत विद्यार्थिनींनी अनेक अडचणींना सामोरे जात घवघवीत यश संपादन केल्याबद्दल विद्यार्थिनींचे कौतुक केले . आर्थिक परिस्थिती बिकट असताना देखील पालकांनी वेळोवेळी ऑनलाइन शिक्षणासाठी प्रोत्साहन देत अभ्यास करून घेतले त्याबद्दल पालकांचे देखील आभार मानले. आपल्या प्रामाणिक प्रयत्नातून अपेक्षेप्रमाणे यश मिळाल्याने मुलींनी आनंद व्यक्त केला. यावेळी विश्वस्त पांडुरंग दिड्डी यांनी शिक्षकांनी यशाची परंपरा कायम राखण्यासाठी विद्यार्थिनींना योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल शिक्षकांचे कौतुक केले. यावेळी उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले, पर्यवेक्षिका प्रणिता सामल, सर्व शिक्षक, विध्यार्थीनी व त्यांचे पालक बहुसंख्येने उपस्थित होते. बालाजी लोकरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर अश्विनी दास यांनी आभार मानले. आशिष मिसाळ, अभिजित सलगर, सचिन मुसळे यांचे सहकार्य लाभले.