• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, May 9, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे ३१ ऑक्टोबर रोजी आयोजन

by Yes News Marathi
October 28, 2025
in इतर घडामोडी
0
पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे ३१ ऑक्टोबर रोजी आयोजन
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर, दि. २८ (जिमाका) – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर आणि मॉडेल करिअर सेंटर, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन शुक्रवार, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी करण्यात आले आहे. हा मेळावा जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आला आहे.

या रोजगार मेळाव्यात १० वी, १२ वी, आय.टी.आय. (वेल्डर, फिटर), डिप्लोमा, कोणतीही पदवी, बी.कॉम, एम.कॉम, ऑफिस असिस्टंट, इलेक्ट्रीशियन, मशिन ऑपरेटर इत्यादी पात्रता धारक उमेदवारांसाठी ६ उद्योजकांकडून एकूण २१० पेक्षा अधिक रिक्त पदांची अधिसूचना प्राप्त झाली आहे.

नोकरी इच्छुक उमेदवारांनी रिझ्युमच्या तीन प्रती व आवश्यक कागदपत्रांसह शुक्रवार, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत खालील ठिकाणी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहावे:

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थकोट पार्क चौक, सोलापूर

अधिक माहितीसाठी 0217-2992956 या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा किंवा प्रत्यक्ष भेट द्यावी, असे आवाहन श्रीमती संगीता खंदारे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर यांनी केले आहे. तसेच उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या अधिकृत पोर्टलला भेट देऊन नोंदणी करावी.

Previous Post

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ लागू

Next Post

६८ लिंगांच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी कोठेंना दिला २ कोटींचा निधी

Next Post
६८ लिंगांच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी कोठेंना दिला २ कोटींचा निधी

६८ लिंगांच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी कोठेंना दिला २ कोटींचा निधी

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In