खोत-पडळकर आंदोलनातून बाहेर, आंदोलन सुरु ठेवायचं की बंद… निर्णय कर्मचाऱ्यांवर

0
152

मुंबई : अखेर 15 दिवसांनंतर राज्यातील एसटी कामगारांचं आझाद मैदानावर सुरु असलेलं आंदोलन मागे घेण्यात येत असल्याची घोषणा खासदार सदाभाऊ खोत यांनी केलीये. काल परिवहन मंत्री अनिल परब यांनी ऐतिहासिक पगारवाढीची घोषणा केल्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच होता. त्यामुळे आंदोलक कर्मचाऱ्यांनी बुधवारची रात्रही आझाद मैदानातच काढली. पण, आज यावर तोडगा अखेर निघालाय.

एस.टी. कर्मचारी आणि त्यांचं नेतृत्व करणाऱ्यांमध्ये फूट पडलेली स्पष्ट दिसते आहे. कारण, भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी मुंबईतल्या आझाद मैदानावर सुरु असलेलं आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. यावेळेस त्यांच्यासोबत आमदार गोपीचंद पडळकरही होते. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या इतर भागात सुरु असलेलं आंदोलन सुरु ठेवायचं की बंद करायचं याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घ्यायचा आहे असही खोत, पडळकर म्हणालेत.