सोलापूर : काँग्रेस भवनासमोरील उपोषण सुटले

0
22

सोलापूर : गेल्या अनेक दिवसांपासून कॉंग्रेस भवन समोर ऊस उत्पादक शेतकरी आंदोलन करत होते सुमारे 29 दिवस हे आंदोलन चालू राहिले. काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या मातोश्री कारखान्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हे आंदोलन होते. बुधवारी आंदोलन आणि उपोषण माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे व शहर अध्यक्ष प्रकाश वाले, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्या उपस्थितीत शेतकरी बांधवाना लिंबु शरबत देऊन उपोषण समाप्त केले. साधारण 400 शेतकऱ्यांचे ऊस बिलाचे 11 कोटी रुपये ऊस बिल अदा करण्यात आले त्यांच्या बँक खात्यात ऊस बिलाची रक्कम जमा करण्यात आली.